ताजे अपडेटविधानसभा निवडणुक 2024

18 वर्षे पूर्ण केलेल्या व मतदार यादीत नाव नसलेल्या प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदणी करावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्ह्यात 35 लाख 78 हजार 792 इतकी मतदारांची संख्या, तर 3723 मतदान केंद्रांची संख्या

Spread the love

सोलापूर : प्रारूप मतदार यादी दि.6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यानुसार जिल्ह्यात 35 लाख 78 हजार 792 इतकी मतदारांची संख्या आहे. तरी ज्यांनी आपल्या वयाचे 18 वर्षे पूर्ण केली आहेत अशा तरुणांनी व ज्यांचे मतदार यादीत अद्याप पर्यंत नाव नोंदवले नाही अशा नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडयासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्वपुर्ण असते, यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविला आहे. दि.6 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुर्ररिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून हा कार्यक्रम दि.6 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
दि.1 जुलै 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्षे पुर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे. 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकामध्ये मताधिकार बजाविणेसाठी ही महत्वाची संधी असलेने पात्र नव मतदारांनी नाव नोंदणी करावी, तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादी मध्ये नाहीतच अश्या सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्र.6 भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खत्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नांव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशिल सुध्दा अचुक आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरूस्त्या करावयाच्या असतील त्यांनी अर्ज क्रमांक 8 भरावा. विशेष संक्षिप्त पुर्रनिक्षण कार्यकमांतर्गत एखाद्या मतदारासंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्यावर राहात नसेल, तर अशा नावा बद्दल त्याच मतदारसंघातील एखदा मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्वाची असते.

*विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम-
नव मतदार नोंदणी, दुरूस्ती व वगळणी यासाठी दि.10 व 11 ऑगस्ट 2024 व दि.17 व 18 ऑगस्ट 2024 या दिवशी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर BLO मतदार यादीसह उपस्थित राहतील.
*मतदार यादी-
दि.23 जानेवारी 2024 च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकुण मतदार 35 लाख 78 हजार 972 इतकी होती, तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, 36 लाख 56 हजार 833 इतकी होती. आज दि.6 ऑगस्ट 2024 रोजी सदर मतदार संख्या ही 36 लाख 92 हजार 409 इतकी असून यामध्ये पुरूष- 19 लाख 8 हजार 146, महिला-17 लाख 83 हजार 966 व इतर 297 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये लोकसभेच्या तुलनेत 35 हजार 576 इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे.
*मतदान केंद्र संख्या
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये एकूण 3617 मतदान केंद्र होती. यामध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करून 124 मतदान केंद्राची नव्याने वाढ होऊन मतदान केंद्राची संख्या 3723 झालेली आहे. एकूण 3723 मतदान केंद्रापैकी शहरी- 1177 व ग्रामीण भागामध्ये -2546 मतदान केंद्राचा समावेश आहे.
तरी नागरिकांनी आपली नावे विशेष पुर्ररिक्षण कार्यक्रम दि.6 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नोंदवून घेण्यात यावीत तसेच तद्नंतर सदर मतदार नोंदणी प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी- voters.eci.gov.in आपली नावे मतदार यादमध्ये शोधणेसाठी ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळाचा वापर करावा. मतदार यादीसंदर्भात काही माहिती आवश्यक असलेस अथवा काही दुरूस्ती असलेस संबंधित सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका