ताजे अपडेट

उजनी धरणातून 1 लाख 25 हजार तर वीरमधून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी

Spread the love

पंढरपूर : उजनी धरण व वीर पाणलोट क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून सायं.5.00 वाजता 1 लाख 25 हजार क्युसेकचा तर वीरधरणातून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. संगम येथून दुपारी 3.00 वाजेपर्यंत 1 लाख 37 हजार 860 क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. भीमा नदी पात्रातील वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंद्रभागा नदी पात्रात सध्या 59 हजार 222 क्युसेक पाणी वहात आहे. संगम येथून येणाऱ्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी पात्रात रात्री 8.00 वाजले नंतर सुमारे 1 लाख 37 हजार क्युसेकने पाणी वाहणार आहे.
भीमा नदीवरील पंढरपूर तालूक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरुन होणारी वाहतूक बंद राहणार आहे.चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात कोणीही उतरु नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलअधिकारी, पोलीस पाटील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनही उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
भीमा नदीपात्रात 1 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 443.600 पाणी पातळी मीटर) नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. 1 लाख 60 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 444.500 पाणी पातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर 2 लाख क्युसेक विसर्ग आल्यावर ( 445.500 पाणी पातळी मीटर) संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते. तर 2 लाख 25 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 446.300 पाणी पातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते. 3 क्युसेक विसर्ग आल्यावर ( 447.850 पाणी पातळी मीटर) कबीर मठ पायथा, जुनी नगरपालिका इमारत या ठिकाणी सुमारे 1 ते 1.5 फुट पाणी येते. 3 लाख 25 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 448.200 पाणी पातळी मीटर) दत्तघाट, माहेश्वरी धर्मशाळा, महाव्दार घाट, कालिका मंदिर चौक या भागात सुमारे 1 फुट पाणी येण्यास सुरुवात होते. असे भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के हरसुरे यांनी सांगितले तसेच वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका