सांगोला : सांगोला तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून डाळिंबाच्या लागवडी कमी झाल्यानंतर अनेक शेतकरी नियमित उत्पन्नाचे स्तोत्र म्हणून दूध व्यवसायाकडून वळल्यामुळे तालुक्यातील अनेक भागातून मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत आहे.परंतु सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असले तरी जे उत्पादन होते त्या दुधामध्ये बाहेर पाठवताना मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची चर्चा असून पांढऱ्या दुधाचा हा काळा धंदा गेल्या काही वर्षापासून काही ठराविक तथाकथित उद्योगपती कडून बिनदिकतपणे सुरू असून लोकांच्याया जीवाशी खेळणार्या या दुध संकलन केंद्रावर अन्न सुरक्षा विभाग कार्यवाही करणार का ?असा सवाल या निमित्ताने सांगोला तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे.
सांगोला तालुक्यामध्ये अनेक खिल्लार जातीची जनावरे असून मोठ्या प्रमाणात भरत असलेला महाराष्ट्रात नावलौकिक असलेला जनावराचा बाजार यामुळे सांगोला तालुक्यात दर्जेदार व दुभत्या,चांगल्या जनावराचा ठेवा शेतकरी वर्गा कडे असल्याने त्या माध्यमातून शेतकरी दूध उत्पादन करून उत्पन्न मिळवत आहेत.यामध्ये प्रामुख्याने जर्सी व म्हैस यांचा समावेश आहे.यात तालुक्यात तब्बल साठ हजार म्हशी व एक लाख दहा हजार जर्शी आहेत.सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध संकलन होत असले तरी जे दूध संकलन होते त्यानंतर ते दूध संकलन केंद्रे परगावी म्हणजेच मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी पाठवले जाते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ 50 टक्के प्रमाणात भेसळ होत असल्याचेही बोलले जात आहे.
या पांढऱ्या दुधाच्या काळ्याधंद्यामुळे सांगोल्यातील काही ठराविक मोजकी मंडळी मालामाल होऊन सध्या मोठ्या फॉर्म मध्ये गाजावाजा करून ग्रँड इव्हेंट करून त्यांच्या उद्योगाच्या ब्रँडचा प्रचार करीत असल्याचेही दिसत आहे.मात्र या ग्रँड इव्हेंट आणि मोठ्या उद्योगाच्या मागे पांढऱ्या दुधाचा भेसळीचा काळा धंदा असल्यानेच हे सर्व मोकाटपणे सर्वांच्या साक्षीने आणि दिमाखात जोमात सुरू आहे,गेल्या आठवड्यामध्ये यातीलच एका दूध संकलन केंद्राच्या दुधाचा टँकर पुण्याजवळ अन्नप्रशासनाने पकडला असल्याचीही चर्चा आहे.परंतु सदरील प्रकरण चव्हाट्यावर न आणता ”तेरे भी चूप मेरी भी चूप” अशा प्रकारे शांत केले?असल्याचेही बोलले जात आहे.मुळात दुष्काळी सांगोला तालुक्यामध्ये अस्सल गावरान जनावराच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या जे काही तालुके दूध उत्पादनात अग्रेसर आहेत त्यात सांगोला तालुक्याचा समावेश होतो.सदरील दूध केंद्रात आठवड्याला किती लिटर दूध संकलन केले जाते? व किती लिटर पुढे टॅंकर द्वारे पाठवले जाते? याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
जिल्हा दूध संघ बंद झाल्याने किंवा त्त्यांचे कामकाज विस्कळीत झाल्याने सांगोला तालुक्यात खाजगी दूध संकलन केंद्र वाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे,त्यामध्ये आठवड्या काठी टॅंकर मागे लाखो रुपयांचे कमाई होत असल्याने या दुधाच्या धंद्यामागे मोठे आर्थिक गणित असल्याचेही बोलले जात आहे,त्यामुळे सांगोला तालुक्यातील काही दूध संकलन केंद्राकडून हा जो पांढरा दुधाचा भेसळीचा काळा धंदा सुरू आहे,यावर अन्नप्रशासनाने तात्काळ कारवाई करून हवेत असणाऱ्या या तथाकथित उद्योजकांना जमिनीवर आणण्याचे काम करून लोकांच्या जीवावर उठणाऱ्या या भेसळीच्या उद्योगास चाप बसवावा अशी रास्त माफक अपेक्षा या निमित्ताने सांगोला तालुक्यातील जाणकार अन्न सुरक्षा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडून व्यक्त करीत आहेत.
चार ते पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आलेला पैसा,मोठमोठे उद्योग,पतसंस्था,बँका यातील नेमका कुठला उद्योग फायद्यात आहे? हे सर्व तालुक्यातील जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसत असताना देखील हे सर्व एवढ्या सुपरफास्ट गतीने सुरू असताना यामागे नेमका कुठला फायद्याचा उद्योग आहे याची चर्चा सांगोला तालुक्यात सुरू आहे.तसेच सदरील दुधाचा धंदा हाच प्रमुख उत्पन्नाचे स्तोत्र असल्याने या मागे दुध भेसळीचे मोठे रॅकेट असल्याचे ही बोलले जात आहे. गेल्या चार-पाच वर्षा पासून हा प्रकार सुरु सुरु असून सहकार आणि उद्योग क्षेत्राच्या अडून अल्पावधीत जो हा उद्योग सुरू आहे या मागे दुधाची भेसळ हाच प्रमुख स्तोत्र असल्याची चर्चा आहे.
