सांगोला: सांगोला बार असोसिएशनचे सदस्य अॅड. सागर बंडू मेटकरी रा.चांडोलेवाडी सांगोला, ता. सांगोला हे दिनांक ३१/०३/२०२६ रोजी रात्री ९. ३० वाजणेचे सुमारास नातेवाईक रावसाहेब शिवाजी मेटकरी यांना पोलीस स्टेशनला बोलविले होते. ते सांगोला पोलीस स्टेशनचे आवारामध्ये उभे असताना सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे व इतर ५-६ पोलीस कर्मचारी हे त्यांचे आले व त्यांना विनोद घुगे म्हणाले की, तु येथे कशाला आला आहेस, त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी वकील आहे व माझे नातेवाईक रावसाहेब शिवाजी मेटकरी यांचेविरूद्धचे गुन्हयाबाबत चौकशी करणेसाठी आलो आहे. त्यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले की, जे काय आहे ते कोर्टात बघायचे, इकडे यायचे नाही असे म्हणून त्यांनी त्यांच्या कानाखाली मारली, त्यावेळी ते त्यांना म्हणाले की, मी वकील आहे तुम्ही मला असे कसे मारू शकता? त्यावेळी त्यांनी वकिलांना चिडून आईवरून शिवीगाळ केली व त्यांच्या कॉलरला धरून ओढत सांगोला पोलीस स्टेशन मधील उत्तर बाजुच्या पत्र्याच्या खोलीमध्ये घेवून जावून पुन्हा तीन-चार गालावर चापटा मारल्या तसेच त्यांच्या जवळचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला व त्यांना रात्रीचे १. ३० वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. त्यानंतर म्हणाले की, तु माझेविरूद्ध कोणाकडे तकार करू नकोस ? नाहीतर आहे हया केसमध्ये गुंतवून जेलमध्ये सडविलेशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली तसेच त्यांनी माझेकडून को-या कागदावर सही घेवून मला रात्री १.३० वाजणेचे सुमारास सोडून दिले. अशा मजकुराचा अर्ज अॅड. सागर बंडू मेटकरी यांनी सांगोला विधीज्ञ संघ सांगोलाचे अध्यक्ष यांचेकडे दिनांक ०१/०४/२०२६ रोजी दिलेला असून सदर अर्जाचे अनुषंगाने आज दिनांक ०२/०४/२०२६ रोजी विधीज्ञ संघामध्ये तातडीची मिटींग बोलावून त्यामध्ये अॅड. सागर बंडू मेटकरी यांचे अर्जाचा व त्यांनी वर नमुद सर्व बेकायदेशीर घडलेल्या कृत्याबाबत विधीज्ञ संघाच्या सर्व सदस्यांनी तिव्र शब्दात निषेध करून संबंधीत पोलीस निरीक्षक विनोद घुगे व अन्य पोलीस कर्मचारी यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करणेबाबत सांगोला विधीज्ञ संघामध्ये आजरोजी एकमताने ठराव मंजुर झाला आहे.
अॅड. सागर बंडू मेटकरी यांना सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे व अन्य कर्मचारी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली व खोटया केसमध्ये गुंतविणेबाबत धमकी दिलेबदद्ल त्यांचेविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करणेत यावी. अशी लेखी तक्रार सांगोला विधीज्ञ संघाच्या वतीने देण्यात आली आहे.या वेळी मोठ्या संख्येने वकील मंडळी सांगोला पोलिस स्टेशन मध्ये उपस्थित होती. दरम्यान वकिलास झालेल्या या मारहानीच निषेध म्हणून सांगोला पंढरपूर व मोहोळ,मंगळवेढा येथील वकील संघाने निषेध म्हणून आज कामकाज बंद ठेवले होते.या घटनेचा सोलापूर जिल्ह्यासह राज्यात ही जोरदार निषेध केला जात आहे.
