गौरी सजावट स्पर्धाताजे अपडेट

भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचा शनिवारी बक्षीस वितरण समारंभ 

Spread the love

 

सांगोला :तालुका प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला” सांगोला शहर आणि तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार २८ सप्टेंबर रोजी सांगोला शहरातील मिरज रोडवरील हर्षदा लॉन्स येथे स ११ वाजता आयोजित केला असल्याची माहिती कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. बक्षीस वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमालाताई गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

मधुमती साळुंखे पाटील, रूपमती साळुंखे पाटील, जयश्री भाकरे, शीलाताई झपके, व राजलक्ष्मी पाटील यांच्याहस्ते हा बक्षीस वितरण समारंभ पार पडेल. या बक्षीस वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमालाताई गायकवाड उपस्थित राहतील तर रत्नप्रभा माळी, सुजाता केदार, मैनाताई बनसोडे, साधवी लोखंडे, राजेश्वरी केदार, शोभाताई खटकाळे, सरस्वती रणदिवे, तबसूम मुजावर, सुवर्णाताई इंगोले, विद्या देशपांडे, शुभांगी पाटील, शांताबाई चोथे, शोभा देशमुख, सरिता साळुंखे, राणी दिघे, छाया पाटील, स्वाती कांबळे, सुवर्णा खंडागळे, यांच्यासह नगरसेविका भामाबाई जाधव, पूजा पाटील, सुनिता खडतरे, रंजना बनसोडे, स्वाती मस्के, सविता बनकर, उर्मिला राऊत, वैशाली सावंत, अनिता कांबळे, सिमिंतीनी स्वामी, अझमुनीसा मुल्ला, चैत्रजा बनकर, शशिकला खाडे, सुजाता कांबळे आदी मान्यवर महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बक्षीसांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला आहे. प्रथम क्रमांकाच्या ५ विजेत्यांना आकर्षक पैठणी मिळतील तर द्वितीय क्रमांकाच्या १० स्पर्धकांना मिक्सर मिळणार आहेत. तृतीय क्रमांकाच्या १५ स्पर्धकांना कुकर मिळणार आहेत. तसेच चतुर्थ क्रमांकाच्या २० स्पर्धकांना टिफीन बॉक्स मिळणार आहेत. याशिवाय पाचव्या क्रमांकाच्या २५ स्पर्धकांना हॉटपॉट मिळणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलांना कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे यांच्यासह सांगोला शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर महिला व प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तरी, शनिवार दि २८ रोजी सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे दु ११.०० वा पार पडणाऱ्या बक्षीस वितरण समारंभास सांगोला शहर आणि तालुक्यातील या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला स्पर्धकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. नेहा साळुंखे पाटील यांच्यासह सुचिता मस्के, सखुबाई वाघमारे, शुभांगी पाटील, अनुराधा पाटील, मंगल खाडे, जयश्री पाटील, जयश्री सावंत, शकुंतला खडतरे, रंजना हरिहर, सुनीता तोरणे, आनंदी इंगोले व वनिता माने यांनी केले.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका