गणेशोत्सवताजे अपडेटसामाजिक कार्य
Trending

भारत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन

महिलांची होणार मोफत हिमोग्लोबिन व थायरॉईडची तपासणी

Spread the love

 

सांगोला : सांगोला शहरातील जुन्या व नामांकित मंडळ असलेल्या भारत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाचे यंदाचे हीरक महोत्सवी ६० वे वर्ष असून मंडळाने यंदाच्या वर्षी १५ फुटी उंच सुबक व नयनरम्य अशी देखणी सिंहासनावर बसलेली आणलेली आहे. आज रविवारी दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन व थायरॉईडची तपासणी देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेट वस्तू देण्यात येणार आहे. याचा लाभ सांगोला शहर व तालुक्यातील सर्व गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

इच्छुक रक्तदात्यानी या रक्तदान शिबिरास उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका