स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू


सांगोला : सांगोला शहरातील जुना मेडशिंगी रोड येथील स्पंदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये आज पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली यामध्ये स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये फुफुसाचे रोग यामध्ये निमोनिया, छातीत पाणी होणे इत्यादी फुफुसाचे आजार,पोटाचे विकार मध्ये आतड्यांचे विकार, हर्निया ,अपेंडिक्स ,जनरल मेडिसिन मध्ये हृदयरोग, अटॅक ,दमा , इमर्जन्सी मेडिसिन, साथीचे रोग, नवजात बालक व बालरोग, कमी दिवसाचे बाळ, कमी वजनाचे बाळ, लहान मुलांचा निमोनिया, दमा, डेंगू ,मलेरिया, टायफाईड ,झटके येणे, किडनीचे आजार ,मेंदू मनका व नसांचे आजार या मध्ये अर्धांग वायू, मेंदूत रक्तस्त्राव ,मेंदूवर सूज, येणे इत्यादी आजार, अपघात ,स्त्रीरोग व प्रसुती, हाडांच्या शस्त्रक्रिया, हाताच्या शस्त्रक्रिया ,पोटाच्या शस्त्रक्रिया ,पायाच्या शस्त्रक्रिया खुबा, मांडी ,मनका ,जबडा तुटणे ,पोटविकाराच्या सर्व शस्त्रक्रिया व लहान मुलांच्या सर्व शस्त्रक्रिया इत्यादी आजारांवर उपचार केले जातात.
स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे अल्पावधीत जनतेच्या पसंतीस उतरलेले हॉस्पिटल आहे यामध्ये त्वचारोग हृदयरोग मेंदू व मनका उपचार तज्ञ प्रत्येक आठवड्याला भेट देत असतात तसेच हॉस्पिटलमध्ये 24 तास फिजिशियन अस्थिरोग तज्ञ सर्जन बालरोग तज्ञ स्त्री रोग तज्ञ हे 24 तास उपलब्ध आहेत सांगोला तालुक्यातील पहिले मान्यता प्राप्त असलेले स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे या योजनेअंतर्गत आता पांढरे पिवळे केशरी रेशन कार्डधारक यांना मोफत योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक व जन्माचा दाखला हे कागदपत्र आवश्यक आहेत यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटलचा खर्च हा महाराष्ट्र शासन ना च्या महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत केला जाईल या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी सांगोला तालुक्यातील सर्व गरजूंनी स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जुना मेडशिंगी रोड वाडेगाव नाका सांगोला येथे भेट द्यावी असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.