ताजे अपडेटनागरी समस्या

सांगोला आगारातील एसटी बसच्या समस्या,दुरावस्थेबाबत कार्यवाही करावी -अशोक कामटे संघटना

Spread the love

सांगोला :सांगोला आगारातील एसटी बस व भौतिक सुविधा अभावाच्या समस्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागाचे विभागीय नियंत्रक सुनील भोकरे यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.सांगोला बस स्थानक हे सोलापूर- कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीचे,महत्त्वाचे बस स्थानक असल्याने दररोज हजारो प्रवाशांची आवक -जावक आहे.या ठिकाणी उत्तम दर्जाची बसव्यवस्था व भौतिक सुविधा असणे गरजेचे आहे.सांगोला आगाराची स्वच्छतेअभावी दुरावस्था झाली आहे दररोज बस स्थानक साफसफाई होत नाही. त्यामुळे अस्वच्छता व कचऱ्याचे ढीग लागलेले असतात, सायंकाळच्या वेळी फक्त एकच एलईडी (मरकुरी) सुरू असलेने रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, गेल्या दोन महिन्यापासून येथील मर्क्युरी बंद अवस्थेत आहे महिला प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण आहे ,बस स्थानकाचा परिसर पाहता अजून किमान चार भागात मोठे एलईडी (होलीजन)सुरू ठेवणे आवश्यक आहे.

पिण्याच्या पाण्याची येथील टाकीची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर वर आला आहे. नियमित या टाकीची साफसफाई करावी.सांगोला आगारात असणाऱ्या बसेसमधुन बसच्या छतातून पाणी गळणे,काचा नसणे, सुस्थितीत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

सांगोला -स्वारगेट या प्रवासास किमान नऊ तासाचा वेळ लागत आहे त्यामुळे प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी आहे . बसेस ह्या सहा तासात पुणे येथे पोहोचणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा प्रवास कंटाळवाणा होत आहे.सांगोला आगारास किमान नवीन 25 बसेस द्यावेत. गेल्या 9-10 वर्षात सांगोला आगारास एकही नवीन बस मिळालेले नाही तरी ती मिळावी. येथील सार्वजनिक टॉयलेट व शौचालयात स्वच्छतेचा अभाव आहे.बस स्थानकाच्या आवारात मोठे खड्डे पडले असून तरी स्टॅन्ड परिसर पूर्णपणे डांबरीकरण करण्यात यावा.सांगोला- स्वारगेट बस टेंभुर्णी व अकलूज, इंदापूर मार्गे प्रत्येकी 2 सकाळ व दुपार सत्रात सुरू कराव्यात.संबंधित विभागास आदेश देऊन सर्व प्रवाशांना चांगल्या सुविधा व सेवा देण्याविषयी कार्यवाही करावी अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशी सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या सर्व मागण्या सकारात्मकपणे सोडवल्या जातील अशी ग्वाही या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमदार शहाजीबापू पाटील, सांगोला आगार व्यवस्थापक विकास पोफळे यांनाही देण्यात आले आहे. यावेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

अशोक कामटे संघटनेच्या निवेदनाद्वारे सांगोला आगारातील समस्यांची माहिती मिळाली तात्काळ संबंधितांना आदेश देऊन एसटी बसची वेग मर्यादा, अपेक्षित वेळेत बस पोहोचणे, नवीन बस सुरू करणे व भौतिक सुविधा निर्माण करण्याकरता तात्काळ कार्यवाही करून अंमलबजावणी करणार आहे . तसेच सांगोला आगारास नवीन बसेस मिळण्याकरिता वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येईल.                             — -सुनील भोकरे,विभागीय व्यवस्थापक,नियंत्रक, सोलापूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका