मोबाईल चोराचा खुन : आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

सांगोला : मोबाईल चोरल्याच्या कारणावरुन चंद्रकांत इरप्पा वाघमारे याचा मारहाण करुन खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अजित महादेव माने, रा. घेरडी, ता. सांगोला याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता केली.
दि. २८.१२.२०२४ रोजी आरोपी अजित माने याचा मोबाईल मयत चंद्रकांत वाघमारे हा चोरत असताना आरोपीने त्यास पकडून मारहाण केल्याने त्याचा हॉस्पीटलमध्ये मृत्यु झाला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.
सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले की, मयताने मोबाईल चोरताना रंगेहात पकडल्याने झालेल्या घटनेत मयतास जखमा झाल्या आहेत, प्रत्येक नागरिकास स्वत:च्या मालमत्तेचे चोरीपासुन रक्षण करण्याचा पुर्ण अधिकार आहे व ते रक्षण करताना झालेल्या कृत्यास गुन्हा म्हणता येणार नाही.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. अनामिका
मल्होत्रा यांनी काम पाहिले.



