ताजे अपडेटन्याय निवाडा
Trending

पितृत्व चाचणी(डी. एन. ए.) ने  खोटा ठरला बलात्काराचा आरोप

मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच नात्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात राहत असलेल्या तरुणाविरुध्द केलेला बलात्काराचा आरोप

Spread the love


सोलापूर : मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच नात्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात राहत असलेल्या तरुणाविरुध्द केलेला बलात्काराचा आरोप पितृत्व चाचणी (डी. एन. ए. टेस्ट) ने खोटा ठरवला आणि त्या निष्पाप तरुणाची बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यांतर्गत केलेल्या बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. खोट्या आरोपामुळे त्या निष्पाप तरुणाला सात महिने तुरुगांत खितपत राहावे लागले होते. सदर तरुणीने आणखी एका तरुणाविरुध्द पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता ही बाब देखील न्यायालयात तिच्या उलट तपासात उघड झाली.
‘पोक्सो’ कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो, याचे जळजळीत उदाहरण असलेल्या या प्रकरणाची हकीकत अशी की, २०२१-२२ साली मोहोळ तालुक्यातील १७ वर्षे ६ महिने वय असलेली सदर तरुणी बार्शी तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिला मासिक पाळी न आल्याने तिच्या आईने तिला बार्शी येथील एका दवाखान्यात तपासण्यासाठी नेले. तेथे तिची सोनोग्राफी तपासणी केली असताना ती १५ आठवड्यांची गरोदर असल्याचे दिसून आले. तिला पुढील तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही गरोदर मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले. शासकीय रुग्णालयात तिचा कायदेशीर गर्भपात करण्यात आला. पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब घेतला. सदर जबाबात तिने डिसेंबर २०२१ मध्ये आरोपीने ती महाविद्यालयात गेली असताना तिला तलावाकाठी नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला आणि ही बाब कोणासही न सांगण्याबद्दल दमदाटी दिली. हा प्रकार वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने सदरची फिर्याद वैराग पोलीस स्टेशनला पुढील तपासासाठी पाठवण्यात आली. सदर फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपीस अटक झाली. तपासादरम्यान सदर गर्भ आरोपीपासूनच झाला आहे हे शाबित करण्यासाठी पितृत्व चाचणीसाठी (डीएनए टेस्ट) करण्यासाठी सदर फिर्यादी मुलीसह आरोपीचा रक्ताचा नमुना आणि अर्भकाचे फिमर बोन काढून रासायनिक तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले. तपास पुर्ण झाल्यानंतर वैराग पोलिसांनी बार्शी सत्र न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.

       या खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी, फिर्यादी मुलीची उलट तपासणी घेतली. त्यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. तिने उलट तपासात कबुली दिली की, २०१९ साली ती गावातील एका तरुणाबरोबर घरामध्ये शरीरसंबंध करीत असताना अचानक तिचे वडील घरी आले व त्यांनी त्या दोघांना रंगेहात पकडले. त्यानंतर तिच्या वडिलांनी त्या तरुणाला मारहाण केली आणि तिला मोहोळ पोलीस ठाण्यात नेऊन त्या तरुणाविरुध्द फिर्याद देण्यास लावली. आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी आपल्या युक्तीवादात सदर तरुणीच्या उलट तपासात झालेल्या या बाबी, पितृत्व चाचणी अहवाल ( डी. एन. ए. टेस्ट ) , त्या तरुणीची विसंगतपूर्व साक्ष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झालटे, ॲड. सिध्देश्वर खंडागळे यांनी काम पाहिले.
पोक्सो बलात्काराच्या खोट्या आरोपावरुन सात महिने विनाकारण कारागृहात बंदिवासात राहावे लागल्यामुळे निर्दोष सुटलेल्या तरुणातर्फे नुकसान भरपाई मिळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
सदर तरूणीने तिच्या गावातील तरुणावर केलेला पोस्को बलात्काराचा खटला अद्याप सोलापूर न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका