ताजे अपडेटनागरी समस्या

पहिल्याच वादळीवारा अवकाळी पावसात विजेचा लपंडाव तर जागोजागी साचला केरकचरा !!महावितरणने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा आणि नगरपालिकेने वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू: डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील

Spread the love

 

सांगोला : हवामानात उष्णता असल्याने उघड्याने नागरिक पुरतेच हैराण झाले आहेत यामध्ये पहिल्याचा अवकाळी पावसात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांमधून तक्रारींचा पाऊस सुरू आहे. यासह वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी केरकचरा जमा होत आहे. शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे. सदरचा कचरा गटारी मध्ये जाऊन गटारी तुंबल्या जात आहेत. याबाबत नागरिकांचा अंत न पाहता महावितरण कंपनीने व नगरपालिका आरोग्य प्रशासनाने आगामी पावसाळा लक्षात घेऊन पूर्वनियोजित दुरुस्तीची व पालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी आणि शहरवासीयांना सोयी सुविधा पुरवाव्यात अन्यथा येत्या काळात संबंधित प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा युवा नेते डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील यांनी दिला आहे.

सांगोल्यात यंदा तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे. उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामध्येच अवकाळी पावसाने अचानकपणे हजेरी लावली दरम्यान हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामध्ये उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना, महावितरण कडून सुरळीत वीज पुरवठा करणे गरजेचे असताना, विजेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे नागरिकांमधून वीज वितरण च्या कारभारा संदर्भात तक्रारीवर तक्रारी करण्यात आल्या. यावेळी महावितरणच्या तक्रार निवारण कार्यालयातून भ्रमणध्वनी बंद करण्यात आला. याबाबत ही सोशल मीडियावरून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. संबंधित महावितरण नागरिकांकडून विज बिल सक्तीने वसूल करत असताना त्याच पद्धतीने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे हे त्यांचे कर्तव्य असताना, याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाने पूर्वनियोजित दुरुस्ती मोहीम हाती घेऊन येत्या पावसाळ्यात देखील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करावा.

सांगोला नगरपालिका प्रशासनाकडून पावसाळा पूर्वनियोजित नियोजन करणे गरजेचे आहे. सांगोल्यात भुयारी गटारी योजना राबवली त्यामुळे रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. अशा ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी चिखलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. यासह शहरात ठिकठिकाणी केरकचरा पडलेला आहे. वादळी वाऱ्यामुळे सदरचा कचरा अनेकांच्या घरासमोर तर रस्त्यावर यासह गटारी मध्ये अनेक व्यवसायिकांच्या दुकानासमोर देखील जमा झाल्याने याचाही त्रास सहन करावा लागला. यामुळे नगरपालिका प्रशासनाने याबाबत खबरदारी घेऊन वेळोवेळी स्वच्छता राबवावी. गटारी साफ करून घ्याव्यात अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा युवा नेते डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील यांनी दिला आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका