गुन्हेगारीताजे अपडेट

सांगोल्यात गुटख्याच्या गोडावून-दुकानावर धाड !! कायद्याचे हात “त्या मुख्य सूत्रधारा” पर्यंत पोहचणार का?

विक्री करणारे दुकान सील; अन्न औषध प्रशासन विभागाची कार्यवाही

Spread the love

सांगोला :पुणे दक्षता विभाग व सोलापूर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अवैधरित्या गुटख्याची विक्री आणि साठा करणाऱ्या दुकानात व गोडाऊनवर धाड टाकून चारचाकी वाहनासह ४ लाख ५३० रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल मस्के, अक्षय मस्के, किसन लोणारी, महेश गोडसे व पुरवठादार बिपीन तेजवानी यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         या गुन्ह्यातील सर्व आरोपीना अटक होईल का? या विषयी सांगोला शहरवासीयांतून संशय व्यक्त केला जात आहे.यापूर्वी बेकायदेशीर गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीस अटक झाली नव्हती,त्यास न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला होता.त्यामुळे गुटख्याच्या या गुन्ह्यात सर्व आरोपीना अटक करावी अशी मागणी ही केली जात आहे.मोठी आर्थिक उलाढाल व देवाण -घेवाण यामुळे यातील मुख्य सूत्रधार हा कायम मोकाटपणे बाहेरच राहून हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत असताना कायद्याचे हात त्या मुख्य सूत्रधारा पर्यंत पोहचणार का? याकडे सांगोला तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवार, २ मे रोजी पुणे दक्षता विभाग व सोलापूर अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे, नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनहळळी यांच्या पथकाने अनिल मस्के यांच्या मस्के पान शॉपमध्ये धाड टाकली. यावेळी त्यांना प्रतिबंधित अन्नपदार्थाचा (गुटखा) साठा आढळून आला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मस्के यांचे पान शॉप,गोडाऊनवर कारवाई करून दुकान व गोडावून सील केले आहे. या कारवाईत ४ लाख ५३० रुपयांचा गुटखा व ५ लाख रुपये किमतीची एम एच १२ डी वाय ९३९१ क्रमांकाची चारचाकी गाडी असा ९ लाख ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल मस्के, अक्षय मस्के,किसन लोणारी, महेश गोडसे व पुरवठादार बिपीन तेजवानी यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुटखाबंदीच्या निर्णयाने महाराष्ट्रात खरोखरच गुटखा बंद झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेजारच्या राज्यातून गुटखा आणून महाराष्ट्रात चढ्या भावाने विक्री होत असल्यामुळे हा काळाबाजार फोफावला आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका