सांगोल्यात बॅंकॉक-पटायाचे फिलिंग महुद रस्त्या लगतच्या हॉटेल-लॉज मध्ये बिनदिक्तपणे “सेक्स रॅकेट”
सेक्स रॅकेटवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याद्वारे कारवाई करण्याची मागणी

सांगोला : सांगोला शहराच्या महूद रस्त्या लगत असलेल्या हॉटेल वजा लॉज मध्ये पुणे-मुंबई येथील मुलींच्या माध्यमातून सेक्स रॅकेट बिनदिक्कत पणे सुरू असल्याची जोरदार चर्चा सध्या सांगोला शहर व तालुक्यात आहे. महूद रोडच्या लगत असलेल्या या हॉटेल-लॉज मध्ये गेल्या काही वर्षापासून अगदी कोरोना काळात ही मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट चालू असल्याची कुजबूज सुरू होती. सदरील सेक्स रॅकेट हे मुंबई-पुणे येथील मुलींच्या माध्यमातून सुरू असल्याने सांगोल्यातच बॅंकॉक-पटायाचे फिलिंग येत असल्याचे बोलले जात आहे. या सेक्स रॅकेट वर सांगोला पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याद्वारे तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.
सदरचे सेक्स रॅकेट हे पूर्णतः मोबाईल वरती कार्यरत असून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण- घेवाण असल्याने सेक्स रॅकेट वरती कारवाई करण्याचे धाडस पोलिस करत नसल्याची चर्चा या निमित्ताने सांगोला शहर व तालुक्यात सुरू आहे.प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. व सध्या सांगोल्यात अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई करणारे सांगोल्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे गेल्या अनेक वर्षापासून महुद रोडवर चालु असलेल्या या सेक्स रॅकेट वर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी सांगोला शहरवासियांतून केली जात आहे.
सेक्स रॅकेट चालवण्यासाठी सदरील मुली मुंबई-पुणे येथून नियमितपणे सांगोला येथे ये-जा करीत असून सांगोला शहर व तालुका परिसरातील अनेक तरुण या सेक्स रॅकेट मुळे बरबाद झाले आहेत. अशा प्रकारच्या सेक्स रॅकेट मुळे सांगोला शहरातील व तालुक्यातील तरुण पिढी बिघडत चालली असून या सेक्स रॅकेट वर कारवाई करण्याचे जाणून बुजून कानाडोळा करण्याचे प्रकार पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू असल्याचे बोलले जात आहे. हे सेक्स रॅकेट चालवण्याकरिता म्होरक्या असून या म्होरक्याने सेक्स रॅकेट मोबाईलच्या माध्यमातून ग्राहकांशी थेट संवाद साधून, मुलींचे फोटो पाठवून तरुण पिढीच्या खिशाला भर दिवसा झळ लावण्याचा उद्योगधंदा जोमात सुरू असल्याने सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.