ताजे अपडेट

चिंचोली तलाव शंभर टक्के भरला; सांडव्यावरून धो..धो.. वाहू लागले पाणी

सेल्फी काढण्यासाठी तरुणांची गर्दी 

Spread the love

 

सांगोला : चिंचोली तलावाच्या लाभक्षेत्रात सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव १०० टक्के भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी धो.. धो…. वाहू लागले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील सुमारे ७२८ हेक्टर क्षेत्रावरील शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाणी मार्गी लागल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. दरम्यान, सांगोला शहरातील निसर्गप्रेमी खळखळून वाहणाऱ्या पाण्यात उभारून सेल्फी काढून घेण्याचा आनंद लुटत आहेत.लघु पाटबंधारे विभाग सांगोला अंतर्गत सांगोला-महूद रोडवर चिंचोली गावाच्या पश्चिमेला चिंचोली मध्यम प्रकल्प (तलाव) आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता १०९ दलघफूट आहे. या तलावाच्या पाण्यावर चिंचोली, बामणी सांगोला (बिलेवाडी) लाभक्षेत्रातील सुमारे ७२८हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असून, उन्हाळ्यात तलावातून कॅनॉल मार्गाने रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडले जाते, तसेच तलावाच्या पाण्यावर जय मल्हार पाणीवापर संस्था व जय हनुमान पाणीवापर संस्था, चिंचोली या दोन संस्था कार्यरत आहेत. चालू वर्षी तलावाच्या लाभक्षेत्रात कमी-अधिक पडलेल्या पावसामुळे तलावाची १०० टक्के भरण्यासाठी वाटचाल सुरू होती. दरम्यान, मघा नक्षत्राचा रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे तलाव १०० टक्के भरून सांडव्यावरून खळखळून पाणी वाहू लागले आहे.

केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारा चिचोली तलाव यापूर्वीच वर्ष १ सप्टेंबर २०१९, २४ सप्टेंबर २०२१, ५ ऑक्टोबर २०२२ व त्यानंतर १७ ऑगस्ट २०२४ असा एकूण चार वेळा १०० टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहिले आहे.                           लघु पाटबंधारे उपविभाग सांगोलाअंतर्गत चिंचोली, हंगीरगे, जवळा, घेरडी (पारे) आचकदाणी अशा पाच मध्यम प्रकल्पांपैकी घेरडी व चिंचोली तलाव १०० टक्के भरले आहेत. तर उर्वरित तीन तलावांची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. घेरडी मध्यम प्रकल्पावर शंभुमहादेव पाणीवापर संस्था-घेरडी, तर जवळा मध्यम प्रकल्पावर बसवेश्वर पाणीवापर संस्था-जवळा कार्यरत आहे.दलघफूट आहे. या तलावाच्या पाण्यावर चिंचोली, बामणी सांगोला (बिलेवाडी) लाभक्षेत्रातील सुमारे ७२८हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असून, उन्हाळ्यात तलावातून कॅनॉल मार्गाने रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडले जाते, तसेच तलावाच्या पाण्यावर जय मल्हार पाणीवापर संस्था व जय हनुमान पाणीवापर संस्था, चिंचोली या दोन संस्था कार्यरत आहेत. चालू वर्षी तलावाच्या लाभक्षेत्रात कमी-अधिक पडलेल्या पावसामुळे तलावाची १०० टक्के भरण्यासाठी वाटचाल सुरू होती. दरम्यान, मघा नक्षत्राचा रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे तलाव १०० टक्के भरून सांडव्यावरून खळखळून पाणी वाहू लागले आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका