ताजे अपडेट

अपघाताचा धोका टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्याची डॉ.परेश खंडागळे यांची मागणी

Spread the love

 

सांगोला  : अपघातांचे वाढते प्रमाण व अपघातामुळे मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून तसेच वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी शहरातील कडलास नाका, खंडागळे हॉस्पिटल आणि सांगोला महाविद्यालयासमोर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या माढा ग्रामीणचे संयोजक डॉ. परेश खडागळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सांगोला शहरातील कडलास रोडवरून जवळा, घेरडी, लोणविरे, सोनंद, डोंगरगाव, शेगाव व जत या महामार्गावर अवजड तसेच इतर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रस्त्यावरच शहरातील अनेक रुग्णालये असल्याने नामवंत रुणांची देखील वर्दळ असते. तसेच याच रस्त्यावर महाविद्यालय व इंजिनिअरिंग कॉलेज असल्याने हजारो विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाल्याने वाहनधारक सुसाट वेगाने वाहने चालवितात, त्यामुळे रस्त्यावर अनेकवेळा लहान मोठे अपघात होऊन अनेकजण दगावले आहेत. तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. सध्याही या महामार्गावर दररोज एक तरी अपघात होत आहे, त्यामुळे संबंधितांनी त्याकडे लक्ष देऊन कडलास नाका, खंडागळे हॉस्पिटल व सांगोला महाविद्यालय अशा तीन ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या माढा ग्रामीणचे संयोजक डॉ. परेश खंडागळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन तहसीलदार, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद तसेच एसटी आगारप्रमुख यांना निवेदन दिले.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका