ताजे अपडेटशेतीवाडी
Trending

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Spread the love

 

सोलापूर  : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस. गावसाने यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्हयाचा रक्कम रु.1551.27 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. सदर योजनेतील घटक ड्रॅगन फ्रुट, अॅवोकॅडो, सुट्टी फुले, मसाला पिके, फळबागा पुनरुज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरीण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँन्टी हेलनेट कव्हर, मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर 20 एचपी पर्यंत, पॉवर टिलर 8 एचपी पेक्षा जास्त व कमी, पिक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, स्थायी / फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर इत्यादी घटकांचा समावेश आहे.
या घटकांचा लाभा घेण्यासाठी शेतक-यांच्या नावे स्वतःची शेत जमिन असणे आवश्यक आहे. शेतकरीकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. जिल्हयातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर प्रवर्गातील सर्व शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस. गावसाने यांनी केले आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका