गुन्हेगारीताजे अपडेट

घेरडी ता. सांगोला येथे बैलगाडी शर्यतीच्या वादातुन झालेल्या गंगाराम गावडे खुन खटल्यात आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर

Spread the love

सांगोला : खांडेकर वस्ती घेरडी ता. सांगोला येथे बैलगाडी शर्यतीच्या वादातुन दि. १५/१०/२०२२ रोजी
झालेल्या गंगाराम गावडे यांच्या खुन प्रकरणी साहुबा बापू खांडेकर , रा. घेरडी याने केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी ॲडी. सेशन्स जज्ज तोष्णीवाल यांचेसमोर होऊन न्यायाधिशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजुर केला.
दिनांक ०९/०४/२०२२ रोजी बैलगाडी शर्यतीत झालेल्या भांडणाच्या कारणावरुन दोन्ही गटात वैमनस्य आलेले होते. दिनांक १५ / १० / २०२२ रोजी मयत गंगाराम गावडे हे आपल्या कुटूंबियासह सांगोला येथे डॉ. अलदर यांच्या दवाखान्यात गेलेले होते. तेथुन ते त्यांच्या कुटूंबियासह बोलेरो जिपमधून आपल्या घराकडे परत जात असताना आरोपी सुरेश मुत्यप्पा खांडेकर, सहदेव @ गौडा लक्ष्मण बंडगर, साहुबा बापू खांडेकर यांचेसह चार जणांनी जिपगाडी रस्त्यात आडवी लावुन येणारी जिप अडवली आणि जिपमधुन प्रवास करणाऱ्या गंगाराम गावडे यांचेवर घातक शस्त्राने हल्ला केला. त्या प्राणघातक हल्ल्यात गंगाराम गावडे यांचा मृत्यु झालेला होता. याप्रकरणी गंगाराम गावडे यांचे चिरंजीव विजय गावडे यांनी सांगोला पोलिस स्टेशनला फिर्याद दिलेली होती. त्या प्रकरणात अटक असलेला आरोपी साहुबा बापू खांडेकर यांनी पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जास सरकार पक्षातर्फे व मुळ फिर्यादीतर्फे प्रखर विरोध करण्यात आला. मुळ फिर्यादीतर्फे जामीन अर्जास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. न्यायाधिशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजुर केला.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. सारंग वांगीकर, मुळ फिर्यादीतर्फे ॲड. धनंजय माने , ॲड.जयदीप माने ,ॲड. सिध्देश्वर खंडागळे , ॲड.सुहास कदम तर आरोपीतर्फे ॲड. गिरीष तपकीरे (सांगली), ॲड. सतिश लेंडवे यांनी काम पाहिले.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका