लोकसभा निवडणुक 2024
Trending

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ;सोलापूर मतदारसंघासाठी 57.46 टक्के तर माढा मतदारसंघासाठी 59.87 टक्के मतदान

Spread the love

 

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात दि. 07 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पार पडली. यावेळी सायंकाळी 6 वाजपर्यंत 42-सोलापूर (अ.जा.) मतदार संघासाठी अंदाजित 57.46 टक्के व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी अंदाजित 59.87 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

यावेळी 43-माढा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महसूल अमृत नाटेकर आदि उपस्थित होते.

यामध्ये 42-सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघाचे एकूण मतदार संख्या 20 लाख 30 हजार 119 इतकी असून यामध्ये 10 लाख 41 हजार 470 पुरुष मतदार, 9 लाख 88 हजार 450 स्त्री मतदार व 199 तृतीयपंथी मतदार आहेत. यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे – मोहोळ 60.16, सोलापूर शहर उत्तर 56.81 , सोलापूर शहर मध्य 56.32, अक्कलकोट 55.31 , सोलापूर दक्षिण 58.21, पंढरपूर 58.09 मतदान झाले, असे एकूण अंदाजित मतदानाची टक्केवारी 57.46 टक्के झाली आहे.

43-माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यातील फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील असून माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 19 लाख 91 हजार 454 इतकी असून यामध्ये 10 लाख 35 हजार 678 पुरुष मतदार, 9 लाख 55 हजार 706 स्त्री मतदार तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 70 इतकी आहे. यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे – करमाळा 55, माढा 61.13 , सांगोला 59.94, माळशिरस-60.28 फलटण-64.23, माण-58.42 मतदान झाले, असे एकूण अंदाजित मतदानाची टक्केवारी 59.87 टक्के झाली आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431
Back to top button
कॉपी करू नका