गुन्हेगारीताजे अपडेट

बनावट पत्रे विकणाऱ्या गोवा स्टील दुकानावर कारवाई

१३ बनावट पत्रे, प्रिंटिंग मशीनसह ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

सांगोला : बनावट छपाई करून जे. एस. डब्ल्यू. कंपनीचे बनावट पत्रे विकणाऱ्या सांगोला शहरातील कडलास रोडवरील गोवा स्टील दुकानावर कंपनीच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांसह कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून १८ हजार ९८० रुपयाचे बनावट पत्रे आणि पन्नास हजार रुपयाची प्रिंटिंग मशीन असा ६८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत हंबीरराव ज्ञानू साठे यांनी गोवा स्टीलचे मालक भिमराव तोलाराम चौधरी रा. सांगोला यांच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.                                                                          याबाबत  अधिक माहिती अशी, हंबीरराव ज्ञानु साठे हे ईआयपीआर इंडिया कंपनीत तपासी अधिकारी म्हणून नोकरीस असून त्यांना जे. एस. डब्ल्यु. कलर कोटेड पत्रे मुळ किंवा नकल केलेले कसे ओळखावे याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच बाजारात नकल केलेला बनावट माल कोणत्या ठिकाणी विक्री होतो, आपल्या मशीनवरती बनवून छपाई होते असे निदर्शनास आले तर स्थानिक पोलीसांच्यामार्फत त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम करीत असतात. सांगोला शहरातील कडलास रोडवरील गोबा स्टील या दुकानात मूळ कंपनीचा पत्रा कॉईल प्रेस मशीनमध्ये टाकून त्याबर प्रिंटरने जे. एस. डब्ल्यु. कंपनीच्या नावाने छपाई करून विक्री करीत असल्याची खबर कंपनीचे अधिकारी हंबीरराव साठे यांना मिळाली.                                                                            याबाबत शहानिशा करून सदर दकान व गोडावून धारकावर कारवाई करण्यासाठी १८. एप्रिल रोजी सांगोला पोलीस ठाण्याचे स.पो.नि. सचिन जगताप, पो. हवा. देवकर, पो.शि. पांडरे असे पोलीस पथक कारवाई करण्यासाठी गेले. कंपनीचे अधिकारी व पोलिसांच्या पथकाने ट्कान मालक भिमराव तोलाराम चौधरी रा. सांगोला यांच्या गोवा स्टील दु‌कानाची झडती घेतली. यावेळी कंपनीचे तपासी अधिकारी हंबीरराव साठेब्यानी जे. एस.डब्ल्यु. कलर कोटेड पत्र्याची तपासणी केली असता त्यावर छोट्या अक्षरामध्ये बनावट छपाई छपाई करीत असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी ६ हजार ८०० रू किंमतीचे आठ फुटाचे ६ पत्रे, ८ हजार ४०० रू किंमतीचे १२ फुटाचे ५ पत्रे, ३ हजार ७८० रू किमतीचे १४ फुटाचे २ पत्रे, ५० हजार रुपये किमतीची प्रिटींग मशीन असा ६८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका