गुन्हेगारीताजे अपडेट
Trending

खळबळजनक बातमी: जिवंत शंख देतो म्हणत भोंदूबाबाबाने दुप्पट पैशाचे आमिष दाखवून २५ लाखाला घातला गंडा

सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील घटना; आरोपीला अटक, चौघांचा शोध सुरू

Spread the love

 

सांगोला : भोंदू बाबांसह पाच जणांनी विश्वासात घेऊन दुप्पट पैशांचे आमिष दाखवत एकास जिवंत शंख देतो व त्या शंखाच्या पूजेसाठी २५ लाख ५० हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केली.

हा प्रकार दि. २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान सांगोला तालुक्यात खिलारवाडी येथे घडला. याबाबत सचिन हरिदास यादव (रा. खिलारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मेघराज आवताडे ऊर्फ बाबा पाटील (रा फळवणी), भोंदू बाबा सुरेश पोपट पारसे (रा. कोळेगाव, ता. माळशिरस), अनिल मोरे व सलीम (दोघे रा. सांगोला) व २५ ते ३० वर्षीय अनोळखी स्त्री अशा पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी भोंदू महाराज सूरज पोपट पारसे यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यादव हे संभाजी ब्रिगेडचे खिलारवाडी शाखा अध्यक्ष आहेत. संघटनेतून अमोल कोरे यांच्याशी ओळख झाली. त्याने फळवणीतील मेघराज अवताडेकडील २५ लाखांचा जिवंत शंख विकला, तर दुप्पट पैसे मिळतील, असे सांगितले. संघटनेतील डॉ. अवधूत इरवाडकर यांनी अवताडे यास फोन करून महूद येथे बोलवले. त्याच्यासमवेत अनिल मोरे व सलीम असे आणखी दोघेजण होते. त्यांनी सचिन यादव यास महूद येथून अकलूजरोडला निर्जनस्थळी नेऊन जिवंत शंख दाखविले.

यासाठी २५ लाख रुपये द्यावे लागतील सांगितले. त्यानंतर सचिन यादव यांनी खिलारवाडी येथील मित्र परशुराम साळुंखे, शेखर गाडे, बालाजी साळुंखे यांना ही हकीकत सांगितली.

फळवणीत पारसे एक कडक बाबा आहेत. ते जिवंत शंखाची पूजा करणार आहेत. जादा माणसं नको म्हणत सचिन यादव व शेखर गाडे व मेघराज मिळून गाडीतून मेघराज यांच्या घरी गेले. पारसे बाबा अंगाला भंडारा, धूप, अगरबत्ती लावून एका शंखाची पूजा करीत होते.बाबा मंत्र म्हणत असताना मेघराज व एक स्त्री बाहेर येऊन सचिनला शंखाची पूजा काही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण होत नाही, दोन दिवसांनी करू, त्यानंतर जिवंत शंख घेऊन जा म्हणत परत पाठविले. दोन दिवसांनी मेघराज अवताडे व अनिल मोरे असे दोघे खिलारवाडीत येऊन त्यांनी बाबा कडक आहेत, त्यांना पूजेचे पैसे द्यावे लागतील म्हणत सचिनकडून ५० हजार घेतले. जाताना त्यांनी दोन दिवसांत शंख आणून देतो सांगितले.

दि. १५ फेब्रुवारी रोजी डॉ. अवधूत इरवाडकर यांनी सचिनला फोन करून होकार असेल तर त्यांना कळवतो म्हणाला. सचिनने मित्र शेखरकडून ३ लाख, परशुराम साळुंखेकडून २ लाख, बालाजी साळुंखेकडून २ लाख स्वतःकडील बँकेतून व नातेवाईकाकडून उसने १८ लाख जमविले. एकूण २५ लाख जमविले. दि. २१ फेब्रुवारी रोजी मेघराज हा अनिल मोरे व सलीम असे मिळून खिलारवाडी स्टँडवर आले. यावेळी मेघराजने जिवंत शंख दाखवून वरील बाजूने दूध ओतल्यावर सचिनकडून २५ लाख रुपये घेतले. तपास पोलिस नाईक बाबासाहेब पाटील करीत आहेत.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका