ताजे अपडेट

शेकापला सांगोला विधानसभा मतदारसंघात जो सन्मान आहे तो पुढच्या पिढीने चालविणे गरजेचे : भाई जयंत पाटील

शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने सांगोल्यात धडकले शेकापचे लाल वादळ

Spread the love

 

सांगोला :शेकापचा कार्यकर्ता जिद्दी असून निष्ठा ठेवणारा आहे जय पराजय होत असतो परंतु आम्ही सन्मान सोडत नाही शेकापला जो आज सांगोला विधानसभा मतदारसंघात जो सन्मान आहे तो पुढच्या पिढीने चालविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
भारतीय शेतकरी कामगार पक्ष तर्फे सोमवारी सांगोला येथे मार्केट यार्डात भव्य शेतकरी मेळाव्यात आ. जयंत पाटील बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे आ.रोहित पवार माई रतनबाई देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड,बाबुराव गायकवाड, चेअरमन रमेश जाधव, कृषी उत्पन्नचे सभापती समाधान पाटील, दत्तात्रय टापरे, अभिषेक कांबळे, शिवसेनेचे सूर्यकांत घाडगे, तुषार इंगळे, सुरज बनसोडे,वैभव केदार यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले की,रोहित पवार यांनी प्रथम पंचवीस वर्ष व्यावसाय केला व त्यानंतर ते आमदार झाले जनतेला कळले पाहिजे या पुढार्‍यांचे उत्पन्न काय? याचा विचार होणे गरजेचे आहे, त्यामुळे रोहितचा अभिमान वाटतो. आपला शेकाप पक्ष वेगळा असून तो केडर आहे या देशात जगायचे असेल तर केंद्रात मोदीचा पक्ष येता कामा नये त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे शेकाप मुळे रामदास आठवले हे खासदार झाले परंतु भाजपामध्ये जाऊन त्यांनी विचाराला तिलांजली दिली अशी खंत व्यक्त केली, शेकाप मध्ये मतभेद असले तरी लोकशाही आहे.
आ. रोहित पवार म्हणाले की, सांगोल्यात एवढे चांगले वातावरण असताना येथील आमदाराला झाडे झुडपे बघण्यासाठी दुसऱ्या राज्यात जावे लागले. दीपक साळुंखे- पाटील यांचे नाव न घेता म्हणाले की जीव गेला तरी शरद पवार यांना सोडणार नाही त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार आहे असे म्हणत सत्तेसाठी ते गेल्याचे दिसते आता ते एकदा पलीकडे गेले की पुन्हा अलीकडे आणण्याची संधी नाही देशात काही शक्तींनी काका पुतण्या मध्ये तसेच भावामध्ये वाद निर्माण करून पक्ष संघटना फोडण्याचे कार्य केले आहे, माझ्या साखर कारखान्यावर कारवाई केली आहे त्याला मी भीत नाही दिल्ली पुढे झोपणार नाही. शेकाप व पवार कुटुंबियांचे जुने संबंध आहे.स्वर्गीय गणपतराव देशमुख व शरद पवार यांनी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीतून तालुका आर्थिक दृष्ट्या समृद्ध केला आहे शेतकरी सुशिक्षित बेरोजगार महिला आदी घटक आज अडचणीत असताना केंद्रातील व राज्यातील सरकारला सर्वसामान्यांना मदत करण्यास वेळ नाही भाजपाला कशाची फिकीर नाही फक्त सत्तेची गरज आहे पार्टी, कुटुंब फोडताना अटी नाहीत परंतु तरुणांना नोकरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मात्र अटी असल्याचे सांगितले जाते खुनी दरोडेखोर चोरांना मंत्रालयामध्ये प्रवेश त्वरित मिळतो परंतु सर्वसामान्यांना मात्र प्रवेश मिळत नाही अशी खंत व्यक्त केली कन्नड साखर कारखान्याच्या बाबती मला अटक होईल व तुरुंगात टाकतील या विचाराने माझे संपूर्ण कुटुंब पत्नी मुले सध्या टेन्शनमध्ये आहे अशी भावना व्यक्त केली परंतु पवार कुटुंब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आहे असेही म्हणाले.
याप्रसंगी अनिकेत देशमुख म्हणाले की आमचे आयुष्य लाल रंगात गेले आहे, पक्षातील चांडाळ चौकडीचा मला विरोध आहे कसा कोणाचा कार्यक्रम करायचा मला चांगले कळते नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे व त्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सांगोल्याची धरती संघर्ष करण्याची आहे या धरतीला सत्यशोधक समाजाचा स्पर्श झाला आहे ही धरती जातीपातीला बळी पडणारी नाही या तालुक्यातील या चार नद्या आहेत त्या नद्यामुळे तालुक्यातील जनतेची मने निर्मळ बनलेली आहे विचाराचे प्रतिष्ठान आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण समाजकारण केले आहे तालुक्यात जे पाणी आले आहे ते सहजासहजी आले नसून त्यासाठी शेकाप कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागलेला आहे असे म्हणाले.
प्रास्ताविक विनायक कुलकर्णी यांनी केले. मेळाव्यास मारुती बनकर, डॉ. प्रभाकर माळी, बाळासाहेब एरंडे, प्रशांत धनवजीर, कल्पनाताई शिंगाडे, स्वाती मगर, मायाक्का यमगर, राणीताई माने, श्रीमती द्रोपदी भगत, उज्वला गावडे, शिवाजीराव शेजाळ यांचे सह आदी मान्यवर हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेपूर्वी सांगोला शहरातून हजारो युवकांची मोटार सायकलची रॅली काढण्यात आली होती.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका