ताजे अपडेटमनोरंजन
Trending

रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून पोटच्या मुलाकडून आपल्या वृद्ध माता-पित्याचा खून

पाचेगाव येथील खून

Spread the love

सांगोला : पाचेगाव बु. (ता. सांगोला) येथील वृद्ध पती-पत्नीच्या दुहेरी खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच आई- वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा समाधान भीमराव कुंभार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री उशिरा अटक केल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खिडकीला बांधून पाय ओढल्याने आईचा मृत्यू झाला. हा प्रकार सुरू असताना आई-वडील मोठमोठ्याने ओरडत होते. परंतु, डीजेच्या आवाजामुळे दोघांचा आवाज बाहेर गेला नाही. दरम्यान, वडील भीमराव त्यास विरोध करताना त्यांचाही गळा दाबून लोखंडी कुटी गळ्यात आरपार घुसवून ठार मारले. ठार झाल्याची खात्री करून बाथरूममध्ये हातपाय धुऊन मिरवणुकीत सामील झाल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली.                          याचा संपूर्ण तपास पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक भीमराव खंणदाळे, सहायक पोलिस निरीक्षक शशीकांत शेळके, खाजा मुजावर, नारायण गोलेकर, अक्षय दळवी, गणेश कुलकर्णी यांनी केला.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका