नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुतीआबा बनकर यांच्या प्रचारासाठी अवतरले वासुदेव; थेट संवादातून मतदारांचा विश्वास जिंकत आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीआबा बनकर

सांगोला : आगामी नगरपालिका निवडणुकीची धामधूम रंगात आली असून सांगोला शहर विकास आघाडी कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती (आबा) बनकर यांच्या प्रचाराला नवचैतन्य मिळाले आहे. आज त्यांच्या समर्थनार्थ सांगोला शहरात परंपरागत वेशभूषेत वासुदेव अवतरले आणि त्यांनी शहरभर फिरत अनोख्या शैलीत मतदारांना लोकशाहीचे महत्व पटवून देत मारुती आबा बनकर यांच्या प्रचारात भर घालून विजयाचे आवाहन केले.
वासुदेवाच्या खास तालात आणि ओवींच्या माध्यमातून करण्यात आलेला हा प्रचार नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होता. अनेकांनी ठिकठिकाणी थांबून वासुदेवाच्या ओव्या ऐकल्या तसेच मारुती आबांच्या विकासाभिमुख कामांची माहिती घेतली.मारुती आबा बनकर यांच्या प्रचारात नव्या पद्धतींचा समावेश करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत असून, आजच्या अनोख्या उपक्रमामुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे. शहरातील कार्यकर्त्यांनीही या आगळ्या-वेगळ्या प्रचाराच्या माध्यमाचे स्वागत केले. सांगोला शहर विकास आघाडी कडून नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांची प्रचारयंत्रणा सध्या जोरदार जोमात असून शहरातील रस्ते, चौक, व्यापारी पेठांमध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद उमटत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
मारुतीआबा बनकर यांच्या सभांना, भेटीगाठींना आणि पदयात्रांना मिळणारा वाढता प्रतिसाद भाजप, शेकाप व दीपकआबा गट पुरस्कृत सांगोला शहर विकास आघाडीला मोठा पाठींबा मिळत असल्याचे चित्र सध्या सांगोला शहरात दिसून येत आहे.
थेट संवादातून मतदारांचा विश्वास जिंकत आहेत…. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीआबा बनकर
सांगोला आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष आणि शहरविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार मारुती आबा बनकर यांनी जनसंपर्काचा धडाका सुरू ठेवला असून थेट संवादाच्या माध्यमातून त्यांनी मतदारांचा विश्वास जिंकण्यास यश मिळवले आहे.
शहरातील विविध प्रभागांमध्ये दररोज घेतल्या जाणाऱ्या भेटीगाठींमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीआबा बनकर नागरिकांच्या समस्या मनापासून ऐकतात, त्यावर तात्काळ उपाययोजनांची दिशा दाखवतात आणि आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना मांडतात. त्यांच्या या जमिनीवर उतरलेल्या प्रचारशैलीमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
मारुतीआबा बनकर यांनी पूर्वीच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत केलेली कामे, स्वच्छ प्रतिमा, स्पष्ट भूमिका आणि शहरात निर्माण केलेली विकासाची परंपरा यामुळे त्यांची लोकप्रियता पुन्हा वाढताना दिसत आहे. पदयात्रा, सोशल मीडियावरील मोठी पोहोच, भेटी गाठीतील तुफान गर्दी आणि नागरिकांचे मनापासून स्वागत पाहता सांगोल्यात मारुती आबा बनकर यांच्या बाजूने सकारात्मक लाट निर्माण झाल्याचे चित्र जाणवत आहे.एकूणच, थेट संवाद आणि विकास केंद्रित दृष्टिकोन यांच्या जोरावर मारुती आबा बनकर आगामी निवडणुकीत आपले स्थान अधिक भक्कम करत असल्याचे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.प्रत्येक प्रभागात होणाऱ्या बैठकींमध्ये सांगोला शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर यांच्याभोवती उत्साहाचे वातावरण निर्माण होत असून अनुभवी नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारसरणीमुळे ते नगराध्यक्ष पदासाठी मजबूत निवड बनत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.