सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचारात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख प्रत्यक्ष मैदानात*

सांगोला: आज सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचारार्थ सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोला शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. श्री. मारुतीआबा बनकर यांचे प्रचारार्थ व चार नंबर प्रभागाचे नगरसेवक पदाचे उमेदवार चंदन होनराव व अमजद बागवान यांच्या मातोश्रीच्या प्रचारार्थ बाबासाहेब देशमुख हे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले बाजारपेठेत उमेदवाराची ओळख स्वतः करून देत होते व सांगोला शहराचा विकास ही फक्त शहर विकास आघाडीच करू शकते त्यामुळे सांगोला शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर व सर्व प्रभागातील 23 उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून देण्याची आवाहन करीत होते त्यासाठी बाबासाहेब देशमुख हे आपल्या दुकानात आल्यावर व्यापाऱ्यांची व्यापाऱ्यांना आश्चर्य वाटत होते व व्यापारी प्रतिसाद त्यांना समर्थन देत होती व या प्रचार रॅलीस भरघोस असा प्रतिसाद मिळाला व शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्या मध्ये चैतन्याची वातावरण होते बाबासाहेब देशमुख यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून उमेदवारांचा प्रचार करून दिल्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात अत्यंत रंगत झाली आहे