स्वतः आमदार डॉक्टर असताना सांगोला शहरातील नागरिकाचे आरोग्य धोक्यात !! ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगोला शहरात धुळीचे साम्राज्य

सांगोला: सांगोला शहरात गेल्या दहा ते अकरा महिन्यांपासून सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामामुळे शहरातील जवळ जवळ अपवाद वगळता सर्वच रस्त्याची अवस्था दयनीय व बिकट झाली आहे.भुयारी गटाराचे काम करताना काँट्रॅक्टरने संपूर्ण रस्ताच खांदून काम केल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे,त्यामुळे ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला असताना शहरातील नागरिक प्रंचंड असलेल्या धुळीमुळे दवाखानाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र सांगोला शहरात पाहायला मिळत आहे.विशेष करून शहरातील स्टेशन रोडवरील रस्त्यावरून जाताना तर नागरिक अक्षरक्ष: धुळीने माखलेल्या अवस्थेतच नाका तोंडात धूळ घेवूनच फिरत आहेत.याच परिसरात सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे निवासस्थान असून तालुक्याच्या लोकप्रतिनिधीच्या घराच्या परिसरात अशी परिस्थिती असेल आणि आमदार हे स्वतः डॉक्टर असताना सांगोला शहरातील नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदरील भुयारी गटारीच्या निविदे मध्ये गटारीचे काम झाल्यानंतर रस्ता दुरुस्त करण्यासाठी ठराविक निधी देखील राखीव ठेवला असल्याची माहिती समोर येत आहे.सांगोला शहरातील अनेक दवाखान्यात सध्या लहान मुलां पासून ते वयस्कर नागरिक सर्दी ,खोकला, श्वसनाचे आजार या वरती उपचार घेत आहेत तर काही जण एडमिट देखील झाले आहेत. यामुळे अनेकजण मास्क लावून फिरत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे.पुर्णतः दुरावस्था झाल्याने या रस्त्याने वाहने चालविने तर सोडाच परंतु पायदळ चालने ही कठीन झाले आहे. अशातच या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनामूळे धुळ उडत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वास्तव्यास असलेल्या नागरीक व व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रस्त्यावर मागील काही महिन्या पासून धुळच-धूळ आहे. स्टेशन रोड वरून प्रवास करणाऱ्या अनेकांना मणयांचे आजार उध्भवल्याचे वास्तव आहे. शिवाय या रस्त्यावरून उडणारी धुळ सभोवतालच्या नागरीकांच्या श्वसनावाटे शरिरात जात असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार देखील जडले आहे. सांगोला शहरातील या धुळीच्या त्रासावर नगरपालिका प्रशासन व विशेषतः स्वतः डॉक्टर असलेल्या सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी या वर जालीम डोस देवून ऐन दिवाळी सणाच्या काळात सांगोला शहरातील नागरिकांना आरोग्यपूर्ण धूळमुक्त रस्ते व्हावेत या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.