सांगोल्यातील आठवडा बाजार परिसरातील लाखो रुपयांचे व्यापारी ‘कठडे’ रिकामे अन् जीवाची बेफिकरी न करता बेशिस्त व्यापारी राष्ट्रीय महामार्गावर
सांगोला नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे बाजारकरू आणि वाहनधारकांची कोंडी

सांगोला :सांगोला आठवडा बाजारात लाखों रुपये खर्च करून व्यापारी व व्यवसायिक यांच्यासाठी पत्राशेड मारून कठडे बांधण्यात आले आहेत, पंरतु नगरपालिकेच्या नियोजन अभावी व्यापारी कठडे ओस पडले असून बेशिस्त व्यापारी यांनी चक्क राष्ट्रीय महामार्ग बाजूला दुकाने लावली आहेत.
बेशिस्त व्यापारी आणि सांगोला नगरपालिकेने दुर्लक्षामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.
पूर्वी ज्याठिकाणी वाहनतळ होते, त्याठिकाणी दुकाने लागल्याने मोठ्या प्रमाणात दुचाकी व इतर मोठी वाहने रोडलगत लावली जात आहेत. सहाजिकच यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
बेशिस्त दुकाने व दुचाकी यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा यावरून छोटे- मोठे वाद होत आहेत.
राष्ट्रीय महामार्गवर होणारी गर्दी अपघाताला निमंत्रण देत असून तात्काळ अश्या बेशिस्तपणाचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.बाजारात मोठ्या प्रमाणात दुचाकी, व्यापारी वर्गाची वाहने येतात, अश्या वाहनांसाठी वाहनतळ व्यवस्था नसल्याने वाहने लावणार कुठं असा सवाल उपस्थित केला जात आहे.