युवा सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवरील भ्याड हल्ल्याचा शिवसेनेकडून तीव्र शब्दात निषेध
दोन दिवसात आरोपीचा शोध घ्या अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल


सांगोला -युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवरील भ्याड हल्ल्यातील आरोपीचा येत्या दोन दिवसात पोलिसांनी छडा लावावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने सांगोला तालुका बंद करून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. यावेळी शिवसैनिकांनी निंदनीय भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते दरम्यान पोलिसांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानासमोर व शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलीसांचा बंदोबस्त ठेवला होता. सागर पाटील यांच्या गाडीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मांजरी, कडलास, बलवडी आदी गावात शिवसेनेच्या वतीने बंद पाळण्यात आला. युवासेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या फॉर्च्यूनर एम एच-४५- ए यु -१९२९ या गाडीवर शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी दगडफेक करून भ्याड हल्ला केल्याची घटना घडली होती दरम्यान या भ्याड हल्ल्याचे सांगोला शहर व तालुक्यात तीव्र शब्दात संतप्त पडसाद उमटले आहेत.

हल्लेखोरांचा हेतू सुनियोजित कटाचा भाग असून पाटील कुटुंबियांच्या सर्व गाड्यांचे नंबर १९२९ आहेत कदाचित त्यांना माजी आमदार शहाजी बापू पाटील किंवा सागर पाटील यांना लक्ष्य ( टार्गेट ) करून हल्ला करण्याचा डाव असल्याचा संशय शिवसेनेला आहे दरम्यान काल शनिवारी सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर सांगोला शहर व तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करुन निषेध नोंदवला. हल्लेखोरांचा त्वरित शोध लावून त्याच्या पाठीमागील कटकारस्थान करणाऱ्या मास्टरमाईंचाही शोध घ्यावा तसेच सागर पाटील यांना पोलीस संरक्षण देऊन या प्रकरणाची चौकशी त्वरित करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, शिवसेना नेते आनंद माने, शहर प्रमुख माऊली तेली, उपशहर प्रमुख समीर पाटील, अच्युत फुले, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडा खटकाळे, शहर संघटक सोमेश यावलकर, प्रा संजय देशमुख, सांगोला विधानसभा प्रमुख अभिजीत नलवडे , सुभाष इंगोले,संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार,हरिभाऊ पाटील, बाळासाहेब आसबे, विद्यार्थी सेनेचे अजिंक्य शिंदे, सुनील पवार, श्रीनिवास करे ,राहुल गायकवाड,विजय बाबर , सुरेश कदम ,अस्मीर तांबोळी,गणेश कदम , रावसाहेब आलदर , राहुल घोंगडे, गणेश मिसाळ , सौदागर केदार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून आरोपीचा शोध घेतला असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल.-भीमराव खणदाळे ,पोलीस निरीक्षक