उपेक्षितांच्या हक्कासाठी मातंग समाज दिपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार
पराभवाचे साक्षीदार होण्यापेक्षा दिपकआबांच्या विजयाचे शिलेदार व्हा - अभिषेक कांबळे


सांगोला : शेकापचे सध्याचे नेतृत्व स्व. गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारला फाटा देण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोधक विकासावर बोलण्यापेक्षा मतदारांना अमिष दाखवत आहेत. विरोधक जातीचे, पैशाचे राजकारण करीत आहेत. दिपकआबांनी ३५ वर्षे जनतेची सेवा केली तर शहाजीबापूंनी ५ वर्षात फक्त खोक्याचं राजकारण केलं. शेकापचे माजी आमदार स्व.गणपतराव देशमुख यांना डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी कधीही मतदान केलं नाही, त्यामुळे डॉ.बाबासाहेब देशमुख यांना मते मागण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मतदारांनी जातीपातीचे राजकारण विसरून विकासाला प्राधान्य द्यावे. या निवडणुकीत उपेक्षितांच्या हक्कासाठी मतदारसंघातील मातंग समाज दिपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.
त्यामुळे पराभवाचे साक्षीदार होण्यापेक्षा दिपकआबांच्या विजयाचे शिलेदार व्हा असे मत काँग्रसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. पी.सी. झपके, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथभाऊ अभंगराव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत खोके घेवून शहाजीबापूंनी गद्दारी केली आहे. दिपकआबांनी आतापर्यंत स्व.गणपतराव देशमुख यांना २५ वर्षे आणि शहाजीबापूंना ५ वर्षे मदत केली पण त्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यांना केलेल्या मदतीची उतराई करण्याची वेळ आली आहे. जो भावाचा होऊ शकला नाही तो जनतेचा कसा होणार…डॉ.बाबासाहेब देशमुख यांना कोणताही प्रश्न विचारा त्यांचे एकच उत्तर आहे….गेली ५५ वर्षे आबासाहेबांनी जनतेची सेवा केली. ज्यांनी गणपतराव देशमुख यांना कधीही मत दिले नाही, त्यांना मते मागण्याचा काय अधिकार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत स्व.गणपतराव देशमुख यांच्या विचारांशी गद्दारी डॉ.बाबासाहेब देशमुख केली आहे. उपेक्षित समाजाच्या हक्कासाठी मतदारसंघातील मातंग समाज महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. दिपकआबांना प्रचंड मनाने विजयी करण्याचा निर्धार मातंग समाजाने केला आहे.
त्यामुळे मतदारांनी गोरगरीब दीन, दलित, उपेक्षित, वंचित समाजाच्या क्रांतीची मशाल हाती घ्यावी अन् दिपकआबांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी केले.