ताजे अपडेटविधानसभा निवडणुक २०२४

डॉ.बाबासाहेब देशमुख हे निश्चित विधानसभेत जातील-खा. धैर्यशील मोहिते पाटील

डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यात कॉर्नर सभा संपन्न.

Spread the love

सांगोला : गेल्या पाच वर्षात सांगोला तालुका कॉन्ट्रॅक्टर विळख्यातून बाहेरच निघाला नाही त्यामुळे सर्व सामान्य माणसांकडे बघायला लोकप्रतिनिधींना वेळच मिळाला नाही त्यामुळे सांगोला तालुक्याचा विकास करणे हेच आमच्या पुढील मोठे आव्हान आहे. येणाऱ्या काळात सांगोला तालुक्यात एमआयडीसी, चांगल्या दर्जाची शैक्षणिक संकुले उभारणार असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगून आदरणीय पवार साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे आज मी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आलो आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या डोक्यावरती पवार साहेबांचा हात असून डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निश्चित विधानसभेत जातील असा विश्वास व्यक्त केला.

सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकासआघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारानिमित्त माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरभावी, मेडशिंगी, वाटंबरे, कडलास , सोनंद येथे जाहीर सभा संपन्न झाल्या. यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, दत्ता सावंत यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, ज्या कुटुंबामागे पवार साहेब संपूर्ण हयात भर ठामपणे उभे राहिले अशा लोकांनी त्यांच्याशी गद्दारी करणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित करून, लाभ घेतलेल्यांनी पवार साहेबांशी गद्दारी केली त्यामुळे जनतेने आता ठरवले आहे की पवार साहेबांबरोबर जे लोक इमानदार राहिले त्यांना निवडून द्यायचे त्यामुळे पवार पवार साहेबांचा डोक्यावरती हात असणारे सर्व उमेदवार विधानसभेत जातील असा विश्वास व्यक्त करत सांगोला तालुक्यातील नागरिकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे असे आव्हान त्यांनी केले.

महाविकास आघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सांगोला येथील एन्ट्रीने तालुक्यातील नेत्यांची हवा टाईट झाली आहे. मोहिते-पाटील यांनी शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचाराचा धडाका लावल्याने डॉ. बाबासाहेब देशमुख हेच महाविकास आघाडीचे सांगोला तालुक्यातील अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की, स्व. आबासाहेबांनी सूतगिरणी काढून रोजगार निर्मितीचे काम केले आहे.तालुक्यातील दोघांनी आजपर्यंत रोजगार निर्मितीसाठी काय काम केले याचा जनतेने विचार केला पाहिजे. गेल्या पाच वर्षात प्रस्थापितांनी गोरगरिबांच्या मुलांचे जीवन उध्वस्त करण्याचे काम केले असून वाळू व्यवसाय कडे मुलांना आकर्षित केले गेल्यामुळे आज तरुण वर्ग व्यसनाधीनेकडे मोठ्या प्रमाणात गेला असल्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे.

यावेळी बोलताना अतुल पवार म्हणाले की,डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देत असताना मी माझ्या एकट्याच्या जीवावर पाठिंबा दिला नसून माझ्या जीवाभावांच्या कार्यकर्त्यांच्या माझ्या पाठीमागे असणाऱ्या सर्वसामान्यांच्या जीवावरती पाठिंबा दिला आहे. गेल्या पाच वर्षात तालुक्यात व्यावसायिक राजकारण झाले असून मेडशिंगीचे कोविड सेंटर तालुक्यातील चुकीच्या माणसांनी बंद केले अशा चुकीच्या माणसांना तालुक्याच्या राजकीय पटलावरून बाहेर केले पाहिजे असे सांगत मी जातीपातीच्या राजकारणाला मानणारा कार्यकर्ता नाही. यापुढे सर्वसामान्यांचा ठोस विकास करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खा.मोहिते पाटील यांनी सांगोला मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार सभांचा धडाका लावल्याने विरोधी गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. खा. मोहिते पाटील यांच्या प्रचारामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका