ताजे अपडेटविधानसभा निवडणुक २०२४

तरुणांना रोजगार देण्यासाठी तालुक्यात एमआयडीसी आणणार-आम. शहाजीबापू पाटील

एखतपूर येथे आम. शहाजीबापू पाटील यांची जाहीर सभा संपन्न

Spread the love

सांगोला -सांगोला तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी महत्वकांक्षी योजना आणल्या असून त्या पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत. तालुक्यातील एक गावही पिण्याच्या व शेतीच्या पाण्यापासून वंचित ठेवले नाही. तालुक्यात मोठी एमआयडीसी उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. तालुक्यातील उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मला भरघोस मतांनी विजयी करावे. तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा पाच वर्षाची संधी द्या. संधीचे सोने करू असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील मांजरी, शिवणे, एखतपूर येथील प्रचार सभेदरम्यान बोलत होते .

यावेळी व्यासपीठावर भाजपच्या नेत्या राजश्रीताई नागणे पाटील, जगदीश पाटील, दत्ता टापरे, सुभाष इंगोले, बबन पाटील, रामचंद्र इंगोले, शंकर फाळके, अण्णा गस्ते, दाऊद काटे, श्रीकांत पाटील,पोपटदादा शिनगारे, समाधान घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, दत्ता टापरे, भीमशक्ती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. महादेव कांबळे, विधानसभा संपर्कप्रमुख ‌अभिजीत नलवडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या विधानसभा निवडणुकीत विकासाभिमुख नेतृत्व असणारे आमदार शहाजीबापू पाटील यांना तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी व एमआयडिसी प्रकल्पांसाठी मतदान देणे आवश्यक आहे. बापूंनी तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या सर्व योजना मार्गी लावल्या आहेत. काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याची शपथ शहाजी बापूंनी घेतली आहे. विरोधक मात्र टीका करण्यात मग्न आहेत. 20 तारखेला मतदानादिवशी‌ धनुष्यबाणापुढील बटन दाबून शहाजीबापू पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. बापू नुसते आमदारच होणार नाहीत तर ते कॅबिनेटमंत्री बनून तालुक्यात येतील. हा आपला सन्मान आहे. खऱ्या अर्थाने‌ बापूच तालुक्याचा विकास करू शकतात. हे सर्वांना माहीत आहे त्यादृष्टीने आपण आपली भूमिका बजावायची आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्या एखतपुर येथील जाहीर सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.महायुतीचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते. या सभेमध्ये दत्ता टापरे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. एखतपूर गावात बापूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या सभेदरम्यान असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला .प्रवेशीत मान्यवरांचे शहाजीबापूंनी स्वागत केले. सर्वांनी एकजुटीने काम करून बहुमताने विजयी करावे असे आवाहन आम. शहाजीबापू पाटील यांनी केले.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका