ताजे अपडेटविधानसभा निवडणुक २०२४

मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील – दिपकआबा साळुंखे पाटील

Spread the love

सांगोला : मतदार संघांतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य असून, सिंचन व्यवस्था निर्माण करणे, पीकविमा व नुकसानभरपाईसाठी विधानसभेत आवाज उठविणे, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवणे, आरोग्य सुविधा दर्जेदार व लोकाभिमुख करणे, मतदारसंघात पाच एमआयडीसी आणून रोजगार व उद्योगाच्या संधी निर्माण करणे, प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारून गोरगरिबांच्या लेकरांनाही चांगले शिक्षण मिळवून देणे, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे आदी कामे आपण प्राधान्याने करू, असे गावभेट दौऱ्यांदरम्यान मतदारांना आश्वासन दिले. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हे माझे ध्येय आहे. मतदारसंघ विकसित करण्यासाठी आणि येथील समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी गावभेट कार्यक्रमादरम्यान दिली.

महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ तरंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी येथे गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मतदारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते.
पुढे बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, राजकीय वारसा कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो, जनतेची कामे करावी लागतात. निवडणुक आली की शेकापला फक्त भंडारा दिसतो, जनतेचे प्रश्न दिसत नाहीत. आतापर्यंत शेकापने जातीपातीचे आणि गटबाजीचे राजकारण केले. समाजाच्या नावाखाली विरोधकांनी स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले. समाजाची मक्तेदारी कुणाच्या हातात नाही, परिवर्तनाची लाट आली असून प्रवेशासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. शिवसेनेत होणारा पक्ष प्रवेश पाहून निवडणुक लढवू का…. दिपकआबांना पाठिंबा देवू अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. मी किती मतांचा मालक आहे हे २३ तारखेला माझे कार्यकर्ते दाखवून देतील. जनतेच्या पाठिंब्यावर विकासाचा सूर्य उगवणार दिपकआबांची शिवसेनेची मशाल धगधगणार असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल मोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, अनिलनाना खटकाळे, सरपंच चंद्रकांत कारंडे, सुरेश गावडे सर, राजू गुजले, एकनाथ कोळेकर मेजर, शिवाजी बंडगर, विश्वनाथ सिद, कृष्णदेव सिद, नारायण डुकरे, राजेंद्र डुकरे, मच्छिंद्र डुकरे, कृष्णा कोळेकर, सुखदेव बंडगर, पंडित साळुंखे, देवाप्पा हाके, संपतराव पवार, पांडुरंग शिंदे, अजित देवकते, शिवाजीराव कोळेकर, सचिन शिनगारे, मधुकर मळगे, दीपक श्रीराम, अनिल वाघमोडे, बिरा पुकळे, सुरेश गवंड, तानाजी आगलावे, राजू हागरे, महादेव काशीद, बाळू माळी, ज्ञानेश्वर माळी, लिंगप्पा माळी,मनोहर काशीद, राजाराम मोहिते, हरीबा गावडे, आनंदराव सावंत, संगीता बुरंगे, अनिल नवत्रे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका