आपुलकी प्रतिष्ठानकडून दिवाळी फराळ व भाऊबीज साडी भेट देऊन ९० वंचित कुटुंबाची दिवाळी गोड!


सांगोला – “एक पणती वंचितांच्या दारी” या उपक्रमांतर्गत सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शहराच्या लगत पालं टाकून राहणाऱ्या, मोल मजुरी करणाऱ्या तालुक्यातील काही वंचितांना व दिव्यांगाना दिवाळीचा फराळ, व महिला भगिनींना भाऊबीजेची साडी भेट देऊन या वंचितांची दिवाळी गोड करण्यात आली.
दिवाळीनिमित्त नरक चतुर्दशीच्या एक दिवस आधी आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य व देणगीदारांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.सांगोला शहरातील वासुद रोड, मिरज रोड, स्मशानभूमी,
गोडसेवाडी आदी भागात तसेच नाझरे, वाकी ( घेरडी), महूद, डिकसळ, आलेगाव या भागात पालं टाकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच दिव्यांग बांधवाची दिवाळी साजरी करण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठान इतर सामाजिक कार्याबरोबरच गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे.
वंचितांच्या पालावर जाऊन ९० कुटुंबाना प्रत्येकी अडीच किलो दिवाळी फराळ, महिला भगिनींना भाऊबीज भेट म्हणून साडी, सुगंधी उटणे, साबण, सुगंधी तेल आदी साहित्य देऊन या वंचितांची दिवाळी गोड करण्याचा छोटासा प्रयत्न दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.
. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, अरविंद केदार, सुरेशकाका चौगुले, प्रा. बाळासाहेब वाघमारे, निलेश नष्टे, अरविंद डोंबे, सुधाकर लिगाडे, वसंत सुपेकर, प्रमोद दौंडे, दीपक कुलकर्णी, बोराळकर सर, अण्णासाहेब मदने, श्रीकांतकाका देशपांडे, संदीप पाटणे, प्रा.राजेंद्र सूर्यवंशी, सोमनाथ सपाटे, दिनेश खटकाळे, अमर कुलकर्णी, अतुल वाघमोडे, नाना हालंगडे, अजयकुमार बाबर, झाडबुके गुरुजी, आदिसह सदस्य नागरिक उपस्थित होते.