विकास कामांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होणार – चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला :सांगोल्याची जागा ही मूळ जागा भाजपची असून २००९ पासून सध्या ही जागा मित्र पक्षाकडे आहे. महायुतीचा अजेंडा घेऊनच भाजप जिल्ह्यात काम करेल. महायुतीत उमेदवारी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर दिपकआबांनी मशाल हातात घेतली आहे. जरांगे फॅक्टर आणि दीपकआबांच्या मशाल हातात घेण्यामुळे महायुतीवर कसलाही परिणाम होणार नाही. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगोला विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपला मिळावा अशी मागणी केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी सांगोल्यात भाजपच्या पदाधिकारी कार्यकत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भाजपच्या सर्वच पदाधिकारी कार्यकत्यांनी हा मतदारसंघ मूळ भाजपचा असल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघ भाजपलाच मिळावा असा दावा सांगितला.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, विकासकामांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होईल. गेल्या पाच वर्षात तालुक्यासाठी साडेपाच हजार कोटींचा निधी मिळाला असून या निधीत भाजपचा खूप मोठा वाटा आहे.सांगोला तालुक्यात विरोधकांना चर्चेला मुद्दाच नाही. सांगोल्याची जागा भाजपला मिळावी यासाठी कार्यकर्ते सातत्याने मागणी करीत आहेत.
जरांगे फॅक्टर आणि दीपकआबांच्या मशाल हातात घेण्यामुळे महायुतीवर कसलाही परिणाम होणार नाही. राज्यात महायुतीचे २०० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार आहेत. भाजपच्या कार्यकत्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला असून हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा अशी मागणी केली असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. वास्तविक सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनं सांगोल्यात मोठा बिघाड झाला असून आता शेतकरी कामगार पक्षाकडूनही निवडणूक लढवली जाणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या मागे शरद पवार यांची छुपी ताकद राहणार असल्याने याचा फायदा थेट शहाजीबापू पाटील यांना होईल, असेही चेतनसिंह केदार यांनी सांगितले.