ताजे अपडेटराजकारण

गुरुवारी १७ ऑक्टोबर रोजी युवा महाराष्ट्र व युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोटार सायकल रॅली

युवासेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील यांची माहिती

Spread the love

सांगोला :महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यासाठी ५ हजार ५०० कोटी रुपये निधी देवून सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला आहे.या निधीतून आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. सांगोला तालुक्यात युवक संघटन व युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगोला येथे गुरुवारी १७ ऑक्टोबर रोजी ११ ते ४ या वेळेत युवा महाराष्ट्र व युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोटार सायकल रॅली तसेच सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे बैठक आयोजित केली असून या रॅलीसाठी व बैठकीसाठी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश परीषा प्रताप सरनाईक,युवासेना सचिव किरण माळी,शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार शहाजीबापू पाटील हे भूषविणार असल्याची माहिती युवासेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील यांनी दिली आहे.

   या मोटरसायकल रॅली दरम्यान,शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन ही रॅली सदानंद मल्टीपर्पज हॉल (मिरज रोड,सांगोला) येथे जाणार असून तेथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.सांगोला शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,पंडित जवाहरलाल नेहरु ,छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतिबा फुले या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ही रॅली सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे बैठकीसाठी मार्गस्थ होणार आहे,असे सागरदादा पाटील यांनी सांगीतले.

या रॅली व बैठकीस युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील,विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख,शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे,विधानसभा संपर्कप्रमुख अभिजीत नलवडे,युवा नेते दिग्वीजयदादा पाटील,ओबीसी सेल जिल्हाप्रमुख शिवाजी घेरडे,जिल्हा प्रमुख जगदीश पाटील,युवासेना जिल्हा उपप्रमुख नानासाहेब मोरे,तालुकाप्रमुख दीपक (गुंडादादा) खटकाळे,शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख राणीताई माने,शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख छायाताई मेटकरी,शिवसेना शहरप्रमुख माऊली तेली,युवासेना शहरप्रमुख समीर पाटील,शिवसेना शहरप्रमुख एस.सी.सेलचे कीर्तीपाल बनसोडे,शिवसेना ओबीसी सेलचे शहरप्रमुख अय्युब मुलाणी,विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख प्रितिश दिघे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे,पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर,मागासवर्गीय सेलचे दीपक ऐवळे,प्रसिद्धी प्रमुख छोटू दौंडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी,सांगोला शहर व तालुक्यातील शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील यांनी केले आहे .

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका