ताजे अपडेटदांडिया

छत्रपती शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दांडिया गरबा नाईट स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

सांगोला :येथील छत्रपती शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ व छत्रपती शिवाजीनगर सांगोला संचलित तसेच चेतनसिंह (बाळासाहेब) केदार सावंत मित्रपरिवार यांच्या वतीने दांडिया गरबा नाईट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ ऑक्टोंबर दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री १० पर्यंत दांडिया गरबा नाईट हा कार्यक्रम मोफत असल्याने या कार्यक्रमाचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेतनसिंह (बाळासाहेब) केदार सावंत मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान सहभागी झालेल्या महिलांसाठी तीन दिवस लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ विजेत्या सात महिलांना सात पैठणी साड्या देण्यात येणार आहेत. माजी नगरसेवक आनंदा माने, अमोल भोसले व सुशांत भोसले, हर्षदा लॉन्स व हॉटेल यशश्रीचे यश जाधव यांच्या वतीने पैठणी साड्या देण्यात येणार आहेत.

      सर्वोत्कृष्ट दांडिया जोडी लझीज पिझ्झा यांच्या वतीने सात हजार एक रुपये व ट्रॉफी, सर्वोत्कृष्ट गरबा जोडी विठ्ठल हार्डवेअर यांच्या वतीने सात हजार एक रुपये व ट्रॉफी, सर्वोत्कृष्ट दांडिया ग्रुप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रताप देशमुख यांच्या वतीने सात हजार एक रुपये व ट्रॉफी, सर्वोत्कृष्ट गरबा ग्रुप तनू थोरात मिसाळ यांच्या वतीने सात हजार एक रुपये व ट्रॉफी, सर्वोत्कृष्ट वेशभूषा पत्रकार किशोर म्हमाणे यांच्या वतीने सात हजार एक रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ज्योतिर्लिंग फ्रुट अँड ट्रान्सपोर्ट सांगोला, श्रीनाथ स्टोन क्रशर अँड ज्योतिस्मती क्रिएशन्स, अनघादत्त इंजिनिअरिंग डेव्हलपर्स, सचिन ज्वेलर्स अँड सन्स, नाथबाबा मंगल भंडार अँड केटरर्स, नाथबाबा डेकोरेटर्स, ब्युटी सलून, रूपदर्शनी अलंकार, महालक्ष्मी कलर जम्बो झेरॉक्स, अपेक्स सायन्स अकॅडमी, बालाजी स्टील फर्निचर, बालाजी रोडवेज पुणे, स्मार्ट कॉम्प्युटर केअर, नितीन सावंत वाढेगाव, अफजल शेख पुणे, हॉटेल संगम कमलापूर, आनंद मंडप सांगोला यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. एस.एस. ट्रॅव्हल्स यांच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी देण्यात येणार आहे. या दांडिया गरबा नाईट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुजाता केदार सावंत, स्वाती मगर, शोभा देशमुख, माधुरी जाधव, राणी पवार, योगिता शिंदे, ज्योती महांकाळ, तनू थोरात मिसाळ, रतन मोहिते यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. सदरच्या स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंडवर ९ ते ११ ऑक्टोंबर दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत होणार आहेत. अधिक माहितीसाठी किरण चव्हाण, विनोद काटकर , शाम माळी, इन्नुस नदाफ, सौरभ देशपांडे, चिवळ्या कोळी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन चेतनसिंह केदार सावंत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका