पतीच्या विजयासाठी पत्नी डॉ. निकिताताई देशमुख यांचा ‘डोअर टू डोअर’ मतदारांशी संवाद

सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघात पतीच्या विजयासाठी पत्नी ‘डोअर टू डोअर’ जाऊन मतदारांशी संवाद साधत असल्याचे चित्र दिसत आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी डॉ. निकीताताई बाबासाहेब देशमुख गावा- गावांत जाऊन महिला मतदारांची संवाद साधत आहेत. गावभेट दौऱ्याव्दारे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रत्येक गावात भेट देऊन महिलांशी, माता भगिनींशी संवाद साधत आहे. डॉ. निकीताताईना मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे.
. सांगोला विधानसभा मतदारसंघात स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांना यांना महाविकास आघाडी-इंडिया अलायन्सकडून उमेदवारी दिली आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. असे असले तरी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी डॉ. निकीताताई देशमुख या देखील सांगोला मतदार संघात घरोघरी जाऊन महिला मतदारांशी संवाद साधत आहेत. ‘माझ्या पतीला साथ द्या, सर्वसामान्य जनतेसाठी निस्वार्थी राजकारण करत देशमुख कुटुंबिय खंबीरपणे उभे राहून मतदार संघाचा विकास अजून भरीव करून दाखवू’, असे आवाहनही डॉ. निकीताताई देशमुख महिला मतदारांना करत आहेत.
डॉ. निकीताताई देशमुख यांचे शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्षाकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. डॉ. निकीताताई देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महिलांकडून मोठा प्रतिसादही मिळत आहे. त्यांच्या प्रचारातील सहभागामुळे निवडणुकीत वेगळाच रंग भरला आहे. डॉ. निकीताताई यांनी गावोगावी भेटी, मेळावे, कोपरा सभा, पदयात्रांच्या माध्यमातून त्यांनी पतीच्या विजयासाठी प्रचारात आघाडी घेतली आहे.
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, निकृष्ट कामे, टक्केवारीचे राजकारण, महिलांवर वाढलेले अत्याचार, वाळूमाफियांची गुंडगिरी यावर देशमुख बंधू टीका करत शेकापचे विकासाचे व्हिजन काय आहे या विषयी ते जनतेला मार्गदर्शन करत आहेत. तर दुसरीकडे डॉ. निकीताताई देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदार संघात मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना देताना पाहावयास मिळत आहेत.