गुन्हेगारीताजे अपडेट
Trending

इंश्युरंस कंपनीचा क्लेम मिळविण्याकरिता महूद येथील टायर गोडाऊनचा घडवला स्फोट

चौंघा वर गुन्हा दाखल

Spread the love

 

सांगोला-महुद नितीन पांडुरंग येथील नरके, क्य ३८ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, ता. सांगोला यांच्या मालकीच्या गोडावूनमध्ये रामेश्वर दत्तात्रय बाड, वय ३४ वर्षे, रा. रा. विठ्ठलापूर, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली ह.मु. गणेश टायर्स शोरूमच्या वर महुद बु।।, ता. सांगोला, जि. सोलापूर यांचे एम. आर. एफ. टायरचे गोडावून होते. त्या ठिकाणी दिनांक १ मार्च २०२४ रोजीचे ०१:२१ वा.चे सुमारास अतिशय मोठा स्फोटासारखा आवाज होवून आग लागली होती. याप्रकरणी सांगोला पोलीस स्टेशनला चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे,या स्फोटात रामेश्वर बाड यांचा चुलत भाऊ अतुल आत्माराम बाड, वय २० वर्ष, रा. विठ्ठलापुर, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली हा स्फोटाच्या ठिकाणी डोक्याची कवटी फुटल्याने मरण पावला होता तसेच रामेश्वर बाड यांचा मेहुणा दिपक विठ्ठल कुटे, वय २७ वर्षे, रा. शिवपुरी, ता. आटपाडी, जि. सांगली ह.मु. महुद बु।।: ता. सांगोला, जि. सोलापूर हा होरपळल्यामुळे गंभीर जखमी असुन त्याच्यावर सध्या पुणे येथे उपचार सुरू आहेत. याबाबत चौकशी अंती सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे, यांनी दिलेल्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र राजुलवार यांच्याकडे या गुन्हयाचा तपास आहे.                                                                     सदर गुन्हयाच्या तपासात निष्पन्न झाले कि, यातील आरोपीनी कट कारस्थान रचुन इंश्युरंस कंपनीचा क्लेम मिळविण्याकरिता मौजे महूद बु।। येधील नितीन पांडुरंग नरके याच्या मालकीच्या जागेतील गोडावून इमारतीचा ९.८०,००,०००/- रकमेचा विमा काढला होता, तसेच त्याच जागेत एम. आर. एफ.टायर्स चे गोडावून असणारा भाडेकरू/आरोपी रामेश्वर दत्तात्रय बाड याने त्या जागेतील मालाचा रु.१,६५,००,०००/- रक्कमेचा विमा काढला होता. त्या विम्याचा सामुहीक आर्थीक फायदा घेण्याच्या उद्देशाने मुख्य आरोपी नितीन पांडुरंग नरळे तसेच रामेश्वर दत्तात्रय बाड यांनी आरोपी दिपक विठ्ठल कुटे, रा. शिवपुरी, ता. आटपाडी, जि. सांगली तसेच अतुल आत्माराम बाड, रा. विठ्ठलापुर, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली यांना आपल्या कटात घेवून त्यांना विम्याच्या रकमेचे हिस्सेवाटे करून आपला व सोबतच्या सहकार्याचा आर्थीक फायदा करण्याच्या उद्देशाने मौजे महुद बु।। येथील नितीन नरळे यांच्या मालकीच्या बिल्डींग ज्यामध्ये रामेश्वर बाड यांचा एम. आर. एफ. टायर्सचा माल होता. त्यातील चांगले टायर्स काढून खराब टायर्सवर त्यांनी प्लास्टिक सोल्युशन तसेच पेट्रोल टाकुन आग लावून पळून जात असतांना झालेल्या आगीच्या स्फोटात अतुल आत्माराम बाड याची कवटी फुटुन तो जागीच मरण पावला तसेच दिपक विट्टल कुटे हा होरपळून गंभीर जखमी झाला. या घटनेचा खुलासा झाल्याने या गुन्हयात मुख्य सुत्रधार आरोपी म्हणून नितीन पांडुरंग नरळे, वय ३८ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, ता. सांगोला, जि. सोलापूर हा निष्पन्न होत असुन घटना घडल्यापासून तो फरार आहे. त्याचा शोध घेवून त्यास अटक करून पुढील तपास सुरू आहे. हा गुन्हा आरोपी १) नितीन पांडुरंग नरळे, वय ३८ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, ता. सांगोला, जि. सोलापूर, २) रामेश्वर दतात्रय बाइ, वय ३४ वर्षे, रा. रा. विट्ठलापूर, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली ह.मु. गणेश टायर्स शोरूमच्या वर महुद बु।।, ता. सांगोला, जि. सोलापूर: ३)अतुल आत्माराम बाड, वय २७ वर्षे, रा. विठ्ठलापुर, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली, ४) दिपक विठ्ठल कुटे, वय २० वर्षे, रा. शिवापुरी, ता. आटपाडी, जि. सांगली ह. पु. महूद बु।।, ता. सांगोला, जि. सोलापूर यांनी कट कारस्थान रचून विमा कंपनीची फसवणूक करून आर्थीक फायदा करण्याच्या उद्देशाने केल्याचे निष्पन्न होत असल्याने सदर गुन्हयात कलम १२० (ब) वगैरे भा.दं. वि. ची वाढ करण्यात आली.

सदरचा तपास पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे स. पो. निरीक्षक रवींद्र राजुलवार, स.पो. निरी. पवन मोरे तसेच सांगोला पोलीस अंमलदार यांनी केली.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका