कोलकत्ता येथील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ उद्यापासून सांगोला येथील डॉक्टरांच्या वैद्यकिय सेवा दोन दिवस बंद


सांगोला : दि. ०९ ऑगस्ट रोजी कोलकत्ता येथील आर. जी. कार मेडीकॅल कॉलेज मध्ये पदव्युतर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. यामुळे डॉक्टरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. आर. जी. कार मेडीकल कॉलेज मधील विधार्थ्यानी या घटनेच्या निषेधार्थ शांतता मोर्चा काढला होता. तेव्हा ३ हजार ते ४ हजार लोकांनी येऊन तेथील डॉक्टरांना मारहाण केली. स्त्री डॉक्टर हिंसाचाराला वारंवार बळी पडतात. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही हॉस्पिटल मध्ये तरतूद करण्यात येत नाही. २४ ते ४८ तास काम करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा मिळत नाही. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांचा जमाव डॉक्टरवर जीव घेणा हल्ला करतात. कोलकत्ता येथील तरुण डॉक्टरची झालेली हत्या हि समाजाला काळिमा फासणारी बाब आहे. या निषेधार्थ सांगोला मेडीकल असोशिएशन आणी इंडिअन मेडीकल असोशिएशन दि. १७/०८/२०२४ रोजी सकाळी ६ वाजलेपासून ते १८/०८/२०२४ सकाळी ६ वाजेपर्यंत (२४ तास) अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद पाळणार आहे. तरी प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, असे लेखी निवेदन तहसिलदार सांगोला यांना दिले आहे.