ताजे अपडेट

सांगोला एस.टी. आगारास चिंचणी यात्रेतून आठ लाख रुपयाचे उत्पन्न

Spread the love

 

 

सांगोला : कर्नाटक राज्यातील चिंचणी येथील मायाक्कादेवी यात्रेसाठी सांगोला एस.टी. बस आगारातून जाऊन येऊन ६८ फेऱ्या करण्यात आल्या. या प्रवासातून १२ हजार ३१५ किलोमीटर पूर्ण झाले. सांगोला एस.टी. आगारास सवलतीसह एकूण आठ लाख १८ हजार ९४४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. चिंचणी यात्रेस महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवासीवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सांगोला आगारातून सोडण्यात आलेल्या आरत-परत ६८ फेऱ्यांतून पाच हजार ७८९ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

  एस.टी. महामंडळाकडून महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत व अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असल्याने एस.टी.तून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. सवलतीसह एस.टी. तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाच हजार ७८९ इतकी नोंदवली गेली आहे. कर्नाटक राज्यातील चिंचणी यात्रेसाठी सांगोला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी मायाक्का देवीच्या यात्रेसाठी प्रत्येक वर्षी जात असतात. यावर्षी चिंचणी यात्रेसाठी सांगोला एस.टी. आगारातून आरत- परत ६८ फेऱ्या सोडण्यात आल्या. प्रवाशांनी यात्रेसाठी स्वतंत्रपणे जादा बसचे बुकिंग केले होते. त्यामुळे प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता प्रवाशांना सुखकर व आनंददायी प्रवास पूर्ण करता आला. ‘प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एस.टी. बस’ हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरले आहे. खासगी वाहनापेक्षा एस.टी. बसमधून प्रवाशांचा सुरक्षितपणे प्रवास पूर्ण झाला. या ६८ फेऱ्यांमधून १२,३१५ किलोमीटर अंतर पूर्ण करण्यात आले. सांगोला एस.टी. बसआगारास सवलतीसह एकूण आठ लाख १८ हजार ९४४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पाच हजार ७८९ प्रवाशांनी ‘लालपरी’तून प्रवास केला आहे. एस.टी.मध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी व हमी घेतली जाते. एस.टी.च्या प्रवासाला प्रवासी चांगला प्रतिसाद देत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सेवेसाठी एस.टी. महामंडळ असे एक समीकरण तयार झाले आहे. इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एस.टी. बसचा प्रवास हा सुरक्षित व कमी खर्चाचा असल्याने एस.टी. बसमधून चिंचणी यात्रेस जाणाऱ्या प्रवाशांची संख्या यावर्षी वाढली आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका