ताजे अपडेट
Trending

सांगोल्याच्या “वैकुंठ स्मशानभूमीत पसायदान”

आपुलकीच्या "पसायदान" फलकाचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते अनावरण

Spread the love

सांगोला : आपुलकी प्रतिष्ठानच्या सौजन्याने सांगोला येथील वैकुंठ स्मशानभूमीत “पसायदान” फलकाचे अनावरण सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.               वैकुंठ स्मशानभूमीत तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पसायदान म्हणणे सोपे जावे यासाठी “पसायदान” फलक बसवण्यात आला आहे. या फलकाचे अनावरण मंगळवारी सकाळी सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर मोक्ष रथासाठी तयार करण्यात आलेल्या शेडचे लोकार्पणही डॉ. गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.

         यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, रमेशअण्णा देशपांडे, सुभाष लऊळकर, अरविंद केदार, दादा खडतरे, अरविंद डोंबे, डॉ. अनिल कांबळे, प्रमोदकाका दौंडे, अच्युत फुले, महादेव दिवटे, प्रभाकर सरगर, विश्वासराव पाटील, सुनिल मारडे आदी सदस्यांसह लक्ष्मण घनसरवाड उपस्थित होते. यावेळी पसायदान फलकासाठी अर्थसहाय्य करणारे गोवा स्टील, मातोश्री अर्थमुव्हर्स व श्रीराम फॅब्रिकेटर्स गोडसेवाडी यांचा तसेच मोक्ष रथ चालक लक्ष्मण घनसरवाड यांचा सन्मान करण्यात आला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका