ताजे अपडेट
Trending

पतीच्या आकस्मित निधनाच्या विरहाने दुसऱ्याच दिवशी पत्नीची आत्महत्या;लग्नानंतर एका महिन्यातच पती-पत्नी दोघांचाही मृत्यू

सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील दुर्दैवी घटना

Spread the love

 

सांगोला: पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने तिसऱ्याच्या दिवशीच ओढणीच्या साह्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना गुरुवार ९ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास वाढेगाव (ता. सांगोला) येथे घडली. याबाबत अनिता निखिल घोंगडे (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

वाढेगाव येथील निखिल घोंगडे याचा ५ डिसेंबर २०२४ रोजी अनिता हिच्याशी थाटामाटात विवाह झाला होता. विवाहानंतर ८ डिसेंबर रोजी निखिल याने लग्नाची रिसेप्शन पार्टीही दिली होती. घरी मंगलकार्य झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी निखिल याचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसल्याने ती निःशब्द होती.

बुधवारी निखिल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री घोंगडे कुटुंबीयांसमवेत निखिलची पत्नी अनिता असे सर्वजण मिळून घरात झोपले होते. गुरुवारी पहाटे ४:३० च्या सुमारास अनिता हिने पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने झोपेतून उठून घराच्या पाठीमागील पत्राशेड मधील लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.

दरम्यान, घरात झोपलेल्या ठिकाणी अनिता दिसून न आल्याने नातेवाइक तिचा शोध घेत असताना तिने पत्रा शेडमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. नातेवाइकांनी तिला खाली उतरून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.

निखिल घोंगडे याच्याशी लग्न केलेली अनिता ही आत्या वंदना शिरसावडे (रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) यांची मुलगी होती. अनिताला मामाच्या मुलाशी लग्न करायचे होते. त्यामुळे घरातील नातेसंबंधामुळे ५ डिसेंबर रोजी दोघांचा विवाह झाला होता आणि अवघ्या एकाच महिन्यात पती-पत्नीचा लग्नाला कोणाची दृष्ट लागली आणि दोघांचा थाटलेला राजसंसार अकस्मात मृत्यूमुळे मोडला.

पतीच्या निधनानंतर तिसऱ्या विधीला पत्नीचा गळफास !

निखिलचा ५ डिसेंबर २०२४ रोजी विवाह झाला. विवाहानंतर एक महिन्यातच अचानक निखिलचा ७ जानेवारी २०२५ रोजी मृत्यू झाला. पती निखिलच्या मृत्यूमुळे विरह सहन न झाल्याने पत्नी अनिता हिने गुरुवार ९ जानेवारी रोजी तिसऱ्याच्या विधी दिवशी गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले.

    पती-पत्नीच्या एकापाठोपाठ दुर्दैवी मृत्यूमुळे घोंगडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाच परंतु दोघांच्या मृत्यूमुळे अख्ख गाव हळहळ व्यक्त करत आहे.तसेच सांगोला तालुक्यातील अनेक जणांनी सोशल मिडिया वर दोघा पती पत्नीचे फोटो स्टेटसला ठेवले होते.
निखिल घोंगडे याच्या वयाच्या ६ व्या वर्षापासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे आई स्वाती दिगंबर घोंगडे यांनी स्वतःची एक किडनी त्यास देऊन त्याचे मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करून जीवदान दिले होते. त्यानंतर तो व्यवस्थित होता.

लग्नानंतर अचानक ६ जानेवारी रोजी त्याला डेंग्यूचा ताप आला म्हणून पुन्हा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्या ठिकाणी निमोनिया आणि रक्तात कावीळ उतरल्याचे निदान झाले आणि त्यात निखिलचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका