ताजे अपडेट

सांगोला तालुक्यातील 24 गावामध्ये महिला सभागृह उभारणीसाठी 4 कोटी 70 लाख रुपयांच्या भरीव निधीस मंजूरी : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिपकआबांचा शब्द पाळला

Spread the love

सांगोला  :बचत गटातील महिलांचे सबलीकरण व्हावे व महिलांना गावामध्ये एक व्यासपीठ निर्माण व्हावे या दृष्टीने तालुक्यातील 24 गावामध्ये महिला सभागृह उभारणीसाठी 4 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मागणीनुसार महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी हा निधी दिला आहे. लवकरच सभागृह बांधकामाची कामे सुरू होणार असल्याची माहिती मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली आहे.
सांगोला तालुक्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक प्रॉडक्ट तयार होत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून बनवलेले विविध प्रॉडक्ट आज राज्यातच नव्हे तर देश पातळीवर पोहोचले आहेत. यामधून अनेक महिलांना अर्थसहाय्य मिळत असल्याने अनेक कुटुंबे आर्थिक बाजूने सक्षम होत आहेत. यासह महिलांचे सबलीकरण होत असून, सांगोला विधानसभा मतदार संघातील दुष्काळी भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. महिलांना एकत्रित येऊन बसवण्यासाठी, संघटनात्मक चर्चा, बचत गटाची कामे, दप्तर लिहिणे व इतर अनुषांगिक कामे करण्यासाठी बैठक व्यवस्था नाही. तालुक्यातील बचतगटातील महिलांना सभागृह बांधून दिले तर सदर महिलांचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार असून त्यांना हक्काची बैठक व्यवस्था होणार आहे. यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे केली होती. सदर मागणीची दखल घेऊन महिला सभागृहासाठी तालुक्यात 24 गावांमध्ये महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधणे यामध्ये जवळा 20 लाख, भोपसेवाडी 20 लाख, कोळा 20 लाख, हातीद 20 लाख, संगेवाडी 20 लाख, अजनाळे 20 लाख, वाटंबरे 20 लाख, पाचेगाव 20 लाख, हंगीरगे 20 लाख, यलमार मंगेवाडी 20 लाख, चिकमहुद 20 लाख, आलेगाव 20 लाख, मेडशिंगी 20 लाख, धायटी 20 लाख, उदनवाडी 10 लाख, पारे 20 लाख, मांजरी 20 लाख, भंडीशेगांव 20 लाख, पळशी 20 लाख, भाळवणी 20 लाख, उपरी 20 लाख, खेडभाळवणी 20 लाख, गार्डी 20 लाख, सोनके 20 लाख, असे एकूण 4कोटी 70 लाख निधी मंजूर झाला आहे.
सदर गावामध्ये लवकरच सभागृह उभारणीचे कामकाज सुरू होणार असून, या निमित्ताने बचत गटातील महिलांना संघटनात्मक चर्चा साठी एक व्यासपीठ तयार होऊन यामधून बचत गटाच्या अर्थकारणाला, महिला सबलीकरणाला आणि बचत गटाच्या उद्योग व्यवसायाला गती मिळणार आहे. असेही मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले आहे.

सांगोला तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला बचत गटासाठी सर्वात मोठा निधी मिळाला.बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायामध्ये महिलांनी गरुडझेप घेतली आहे. या उद्योगाच्या माध्यमातून अनेक कुटुंबामध्ये आर्थिक क्रांती घडत असताना, बचत गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी सर्वप्रथम महिला सभागृह असणे गरजेचे आहे. सभागृह बांधकामासाठी अनेकदा महिलांकडून मागणी होत असताना या मागणीची दखल घेऊन मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पुढाकार घेऊन तालुक्याच्या विविध गावांमध्ये सभागृह बांधकामासाठी निधीची मागणी केली आणि तो मंजुर ही करून आणला. अनेक वर्षाच्या मागणीनंतर आता महिलांसाठी स्वतंत्र दालन उभा राहणार असल्याने तालुक्यातील बचत गटाच्या महिलांकडून महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे व मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे आभार मानले जात आहेत.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका