ताजे अपडेट

मार्च अखेर टेंभूचे पाणी माण नदीत सोडण्यात येणार- आ.शहाजीबापू पाटील

Spread the love

सांगोला : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सूचनेची दखल घेत टेंभूच्या अधिकाऱ्यांनी टेंभू योजनेच्या पाण्याने जुनोनी, हातीद, पाचेगांव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचे काम सुरू आहे. उपलब्ध पाण्यानुसार जुनोनी तलाव ओव्हर फ्लो करून त्या खालील असणारे ओढयावरील बंधाऱ्यात पुरेसे पाणी देण्याचे नियोजन करणेत आले आहे. तसेच ग्रामस्थांनी परस्पर कालव्यावरील आऊटलेट ओपन करू नये अन्यथा पाणी देण्याच्या नियोजनात बदल होवून वेळ होवू शकतो. त्यासाठी टेंभूचे आवर्तन पूर्ण क्षमतेने भरून देत असताना सहकार्य करण्यासाठी जुनोनी, हातीद, पाचेगांव या गावातील सरपंचांना टेंभूच्या कार्यालयाने पत्रव्यवहार केला आहे.

         तसेच मार्चअखेर टेंभू योजनेच्या पाण्याने खवासपूर ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पुरेशा पाण्याने भरून देण्यात येणार आहेत. टेंभूच्या आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात टेंभूचे पाणी मिळाल्याने पिण्याचा पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने जुनोनी, हातीद, पाचेगांव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी येथील तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह माणनदी नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका