ताजे अपडेटराजकारणविधानसभा निवडणुक २०२४
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ खा.श्रीकांत शिंदे यांची महूद येथे मंगळवारी जाहीर सभा

सांगोला : 253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू राजाराम पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांतजी शिंदे यांची मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता महुद येथील बाजार पटांगणामध्ये जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेसाठी सांगोला तालुक्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार यांनी मोठ्या संख्येने सभेस उपस्थित राहावे.असे आवाहन शिवसेना सांगोला तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

