सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष गोविंद जाधव यांचे निधन
उद्या सोमवारी सकाळी ८.३० वाजता सांगोला येथे अंत्यसंस्कार

सांगोला: सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व डॉ. गणपतराव देशमुख सहकारी सुतगिरणीचे माजी व्हा. चेअरमन गोविंदराव जयराम जाधव यांचे आज रविवार (दि. १) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ८८ होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवार (दि. २ डिसेंबर) रोजी सकाळी ८.३० वाजता वाढेगाव नाका, स्मशानभूमी, सांगोला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्व.भाई. गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. सांगोला नगरपरिषदेचे तीन वेळा त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्याचप्रमाणे सांगोला नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात ५ मुले, र मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सांगोला नगरिमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
