संकेत संतोष भोसले याची ४ पदावर सरळसेवा भरती मधून निवड

सांगोला : सांगोला येथील रहिवाशी संकेत संतोष भोसले याची ४ पदावर सरळसेवा भरती मधून निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकत्याच घेतल्या गेलेल्या सर्व सेवा भरती परीक्षेत संकेत संतोष भोसले याने घवघवीत यश संपादन केले आहे त्याची १) नगरपरिषद ज्यु. इंजिनिअर २) Zp मध्ये CEA ३) WRD ( जलसंपदा विभाग ) मध्ये CEA. ४) सिटी सर्व्हे मध्ये सर्व्हेअर अशा ४ पदावर निवड झाल्याबद्दल संकेतचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सांगोल्यातील प्रथितयश सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर संतोष नामदेव भोसले यांचे ते चिरंजीव आहेत.
संकेत याचे प्राथमिक शिक्षण उत्कर्ष विद्यालय येथे माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर, ११ वी,१२ वी ए.डी.जोशी कॉलेज सोलापूर येथे तर इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षण वालचंद कॉलेज सांगली येथे झाले आहे.