ताजे अपडेट

सांगली – सोलापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या खवासपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सेतू पुलाचे उद्घाटन एक ऐतिहासिक क्षण

आमदार शहाजीबापू पाटील यांचे हस्ते पुलाचे उद्घाटन

Spread the love

सांगोला : उंबरगाव- खवासपूर विठलापूर या गावांना व सांगली – सोलापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या खवासपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सेतू पुलाच्या बांधकामासाठी 10 कोटी 80 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला.या पुलाचे कार्यक्रम आपल्या सर्वांच्या जीवनातील एक ऐतिहासिक क्षण आहे . खवासपूर गावातील ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची या पूल बांधणीची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. या पुलामुळे वेळेची व पैशाची बचत होणार आहे. खवसपूर गावासाठी 50 कोटी रुपये निधी खर्च करून गावचे अनेक प्रश्न सोडवण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी खवासपूर येथे केले.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . पुलाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते माण नदीवर बांधण्यात आलेला खवासपूर -विठलापूर- उंबरगाव हा सेतूपुल म्हणजे दोन जिल्ह्यांना व जिल्ह्यातील प्रवासी व ग्रामस्थांना जोडणारा पूल आहे .गेल्या अनेक वर्षापासूनची समस्या, प्रश्न या पुलामुळे सुटला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी व तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे . माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाची अडचण सोडवण्यासाठी बांधील आहे. ज्या गावांमध्ये निवडणुकीच्या वेळी पाल पडत नव्हते त्या गावाला सुद्धा दुजाभाव न करता खूप निधी दिला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी साथ देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. या पुलाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्याचे जाहीर करीत पूल वाहतुकीसाठी लोकार्पीत केला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी सांगितले की, आमदार शहाजीबापू पाटील यांनी माण नदीला टेंभूचे पाणी दिले. त्याचबरोबर नदीवर दळणवळणासाठी छत्रपती शिवाजी महाराज सेतू पुल उभारण्यात आला .बापूंच्या हातून तालुक्याचा चौफेर विकास घडत आहे. शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विकास कामांची इतिहासात नोंद होईल. आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात केलेल्या कामाचा प्रगती अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे. मुख्यमंत्र्यानी अहवाल प्रकाशनावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या समाधानकारक कामाचे विशेष कौतुक केले . तालुक्यासाठी 5 हजार कोटीहून अधिक निधी आणून सर्व गावांना योग्य न्याय दिला आहे . आमदार शहाजीबापूंना पुन्हा एकदा आमदारच नव्हे तर नामदार करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन दादासाहेब लवटे यांनी केले. तसेच मुंबईमध्ये दसरा मेळावा होणार असून शहाजीबापू पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत, याचा तालुक्याला अभिमान आहे.

या कार्यक्रमासाठी मुरलीधर जरे, हरिभाऊ जरे ,शामराव बागल, माजी सरपंच लक्ष्मण भोसले, सरपंच विठ्ठल बाड, दगडू भोसले, पांडुरंग यादव, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, राजू गायकवाड, राम चव्हाण, कैलास फुले, तानाजी बोडरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अशोक मुलगीर,

सोमनाथ म्हेत्रे, ब्रम्हनाथ घाडगे , ठेकेदार जयसिंग पवार, अंकुश यादव, गुलाब बागल ,कांचन जाधव, शिवाजी ऐवळे, इंजिनिअर पाटील, प्रवीण माने यांच्यासह आदी मान्यवर तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन खांडेकर यांनी केले

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका