ताजे अपडेटविधानसभा निवडणुक २०२४

महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ, अंबिका मंदिरात नारळ फोडून सांगोला शहरात केला प्रचाराचा शुभारंभ

पदाधिकारी, कार्यकर्ते ,मतदार, युवावर्ग यांचा प्रचंड प्रतिसाद

Spread the love

सांगोला : 253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिकादेवीचे दर्शन घेऊन , नारळ फोडून शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला . आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाच वर्षात तब्बल 5 हजार कोटीची विकास कामे करून तालुक्यामध्ये विकासाचा डोंगर उभा केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदार शहाजीबापू पाटील हे महायुतीकडून निवडणूक लढवत असून शहरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला . सांगोला शहरातील प्रचार शुभारंभ प्रसंगी शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख राणीताई माने, महिला शहर प्रमुख छायाताई मेटकरी, शिवसेना महिला शहरउपप्रमुख लतिका मोटे, महिला शहर समन्वयक शोभाकाकी घोंगडे, राजलक्ष्मीताई पाटील, राणीताई पाटील, शांताताई हाके,माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार, शिवसेना शहर उपप्रमुख विजय इंगोले आदी मान्यवरांच्या हस्ते अंबिकादेवीचे दर्शन घेऊन श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रचार शुभारंभ प्रसंगी शिवसेना सांगोला शहर संघटक आनंदाभाऊ माने, शहराध्यक्ष माऊली तेली, उद्योगपती आनंद घोंगडे, शिवसेना शहर उपप्रमुख अस्मिर तांबोळी, शिवसेना शहर समन्वयक अरुण बिले, युवासेना शहर प्रमुख समीर पाटील, शहर उपप्रमुख सुजित भोकरे, काशिलिंग गाडेकर, सागर नरूटे, एससी सेल उपप्रमुख राजेंद्र बनसोडे, शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश्वर यावलकर, शिवसेना शहर सहसंघटक अरुण पाटील, शिवसेना सह समन्वयक अच्युत फुले, शिवसेना शहर प्रमुख ओबीसी सेलचे आयुब मुलाणी, शिवसेना शहरसंघटक ओबीसी सेलचे प्रभाकर घोंगडे ,शिवसेना शहर संघटक रुकसाना मुजावर, प्रसिद्धी प्रमुख छोटू दौंडे, मायाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, भाजपचे डॉ. मानस कमलापूरकर, प्रवीण जानकर, आनंद दौंडे, प्रवीण इंगोले, राजेश खडतरे, गणेश धतिंगे, सचिन पुणेकर शिवाजी गावडे, स्वप्निल कांबळे, आसपाक मुलाणी , रोहित गेजगे, राहुल चौधरी, शैलेश पवार, राहुल गेजगे,बिरा खांडेकर ,सुजित जोशी, गणेश चव्हाण, दादा चव्हाण, अतुल गरंडे, पारस डांगे, दीपक जानकर, तोहिद शेख, सोहेल इनामदार ,आकाश घोंगडे, सुरेश जाधव, आशिष जाधव ,अक्षय महिमकर, आनंद बनसोडे ,शरद गावडे ,आदिनाथ नरूटे, पिंटू सादिगले, मदनराज मदने ,योगेश साळुंखे ,आतिक मुजावर, ऋषी जानकर आदी पदाधिकारी ,कार्यकर्ते, मान्यवर व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी सांगोला शहरातील अहिल्यानगर, इंदिरानगर, वजराबादपेठ लोहार गल्ली, बुरुडगल्ली, गोंधळगल्ली, भारतगल्ली, सनगरगल्ली, साठेनगर, यश नगर व विद्यानगर या ठिकाणी होम टू होम प्रचार करण्यात आला. महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्याकडून मतदारांना मतपत्रिका नमुना दाखवून धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आमदार शहाजीबापू पाटील यांना विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका