ताजे अपडेट

सांगोला शहरातील बस स्थानकातील विहिरीमध्ये टाकला कचरा

सांगोला नगरपालिकेची दुकानदारावर धडक कारवाई

Spread the love

सांगोला : शहरातील बस स्थानकातील विहिरीमध्ये कचरा टाकत असल्याचा व्हिडीओ नगरपरिषदेस आल्यानुसार नगरपरिषदेमार्फत शहानिशा केली असता व्हिडिओ मधील माणसे ही नवनाथ रसवंती गृह मधील असल्याचे निदर्शानास आलेले आहे. सदर दुकानामधील उसाचे चिपाड त्यांनीच विहिरीमध्ये टाकले असल्याने सदर दुकानावर नगरपरिषदेने दंडाची कार्यवाही केली आहे.

सांगोला शहरात नगरपरिषदेमार्फत कचरा संकलन करणेकामी 10 घंटागाड्या व 3 ट्रॅक्टर च्या सहाय्याने कचरा संकलित केला जातो. तसेच शहरातील व्यापारी वर्गासाठी कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था केली आहे. शहरातील नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये यासाठी नगरपरिषदेमार्फत जाहीर दवंडी, आवाहन याद्वारे जनजागृती करुन माहिती देण्यात आलेली आहे. शहरातील नागरिक ही मोठ्या प्रमाणात त्यांचे घरातील, आस्थापना मधील ओला, सुका व घरगुती घातक असा वर्गीकृत कचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीत वाहनात देतात. यामुळे शहर कचरामुक्त राहण्यास मदत होत आहे परंतु शहरातील बस स्थानकातील विहिरीमध्ये कचरा टाकत असल्याचा व्हिडीओ नगरपरिषदेस पाठविला होता. त्यानुसार नगरपरिषदेमार्फत शहानिशा केली असता व्हिडिओ मधील माणसे ही नवनाथ रसवंती गृह मधील असल्याचे निदर्शानास आलेले आहे.          सदर दुकानामधील उसाचे चिपाड त्यांनीच विहिरीमध्ये टाकले असल्याने सदर दुकानावर नगरपरिषदेने दंडाची कार्यवाही केली आहे. शहरातील नागरिकांनी, व्यावसायिकांनी कचरा नगरपरिषदेच्या वाहनात द्यावा इतरत्र टाकू नये अन्यथा नागरी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 चे तरतुदीनुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी सांगितले.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका