ताजे अपडेट

अखेर लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळास राज्य सरकारची मंजुरी ; अजितदादा पवार यांच्या माध्यमातून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश 

Spread the love

 

सांगोला : संपूर्ण राज्यातील लोणारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळास अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या निर्णयाबद्दल दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

संपूर्ण राज्यभरात लोणारी समाज विस्तारला आहे. लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही या समाजाची अनेक वर्षांची मागणी होती. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अन्य नेतेमंडळींकडे वारंवार पाठपुरावा केला होता. लोणारी समाजाचे राज्यातील एकमेव आमदार म्हणून बहुमान मिळालेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांचा सांगोला येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करून या सत्कार समारंभातून सर्वात प्रथम ही मागणी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती.

समाज व्यवस्थेत अत्यंत गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या लोणारी समाजाच्या तरुणांना राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात मदतीचा हात दिल्यास या समाजातील तरुण स्वतःच्या पायावर उभा राहून उद्योग जगतात लोणारी समाजाचा नावलौकिक करतील अशी आग्रही मागणी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली होती. लोणारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर राज्य सरकारने अखेर शिक्कामोर्तन केल्याने सांगोला तालुक्यासह संपूर्ण राज्यभर पसरलेल्या लोणारी समाज बांधवात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोणारी समाजातील तरुणांना राज्य सरकारकडून मदतीचा हात मिळावा यासाठी राज्य सरकारने स्वतंत्रपणे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी ही सांगोला तालुक्यातील समाज बांधवांनी माझ्याकडे मागणी केली होती. या मागणीसाठी राज्य सरकारकडे आणि विशेषता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला लोणारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासह राज्य सरकारचे आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार.-मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर .          लोणारी समाज सदैव दिपकआबा साळुंखे पाटील यांचा ऋणी राहील लोणारी समाजातील होतकरू तरुणांसाठी राज्य सरकारकडून मदतीचा हात मिळावा आणि यासाठी लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही मागणी सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीसाठी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करून अखेर लोणारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मागणी पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण सांगोला तालुक्यासह राज्यभर विस्तारलेला लोणारी समाज सदैव दिपकआबा साळुंखे पाटील यांचा ऋणी राहील.           – पै सुरेश गवंड, उपाध्यक्ष लोणारी समाज संघटना सांगोला

 

 

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
कॉपी करू नका